Join us

Abhishek Sharma World Record : सर्वात कमी चेंडूत १००० धावा! अभिषेक शर्मानं प्रस्थापित केला नवा विश्वविक्रम

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत १०० धावा करणारे फलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 15:06 IST

Open in App

IND vs AUS Abhishek Sharma Breaks Tim David  World Record  : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मानं विश्वविक्रमाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरुवात करताना या सामन्यात ११ धावा पूर्ण करताच अभिषेक शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १००० धावांचा टप्पा गाठला. सर्वात कमी चेंडूत हा डाव साधत त्याने विश्वविक्रम आपल्या नावे केला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अभिषेक शर्मानं मोडला टिम डेविडचा वर्ल्ड रेकॉर्ड

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत १००० धावा करण्याचा विश्वविक्रम याआधी ऑस्ट्रेलियन स्फोटक बॅटर टिम डेविड याच्या नावे होता. अभिषेक शर्मानं त्याचा विक्रम मोडीत काढत सर्वात कमी चेंडूत १००० धावांचा पल्ला गाठण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. भारताच्या युवा स्फोटक बॅटरनं ५२८ चेंडूचा सामना करताना १००० धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीत टिम डेविडच्या पाठोपाठ सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय टी-२० संघाच्या कर्णधाराने ५५३ चेंडूत हा डाव साधला होता. 

IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल

आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत १०० धावा करणारे फलंदाज

  • अभिषेक शर्मा (भारत) - ५२८ चेंडू 
  • टिम डेविड (ऑस्ट्रेलिया) - ५६९ चेंडू 
  • सूर्यकुमार यादव (भारत) - ५७३ चेंडू
  • फिल सॉल्ट (इंग्लंड) - ५९९ चेंडू 

भारताकडून सर्वात जलद १००० धावा करणारा ठरला दुसरा

भारताकडून आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आघाडीवर आहे. त्याने २७ डावात अशी कामगिरी करून दाखवली होती. अभिषेक शर्मानं त्याच्यापेक्षा एक डाव अधिक घेत या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Abhishek Sharma's World Record: Fastest 1000 Runs in T20!

Web Summary : Abhishek Sharma broke Tim David's record, achieving 1000 T20I runs in just 528 balls. He surpassed David (569) and Suryakumar Yadav (573). Kohli leads Indians with fastest 1000 runs in 27 innings; Abhishek took 28.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअभिषेक शर्मासूर्यकुमार यादवविराट कोहली