IND vs AUS Abhishek Sharma World Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मानं विश्वविक्रमाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरुवात करताना या सामन्यात ११ धावा पूर्ण करताच अभिषेक शर्मानं आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १००० धावांचा टप्पा गाठला. सर्वात कमी चेंडूत हा डाव साधत त्याने विश्वविक्रम आपल्या नावे केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अभिषेक शर्मानं साधला सर्वात कमी चेंडूत १००० धावांचा डाव
आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत १००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत याआधी सूर्यकुमार यादव अव्वलस्थानावर होता. अभिषेक शर्मानं त्याचा विक्रम मोडीत काढत सर्वात कमी चेंडूत १००० धावांचा पल्ला गाठण्याचा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. भारताच्या युवा स्फोटक बॅटरनं ५२८ चेंडूचा सामना करताना १००० धावा पूर्ण केल्या आहेत. भारतीय टी-२० संघाच्या कर्णधाराने ५५३ चेंडूत हा डाव साधला होता.
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत १०० धावा करणारे फलंदाज
- ५२८ चेंडू – अभिषेक शर्मा
- ५७३ चेंडू – सूर्यकुमार यादव
- ५९९ चेंडू – फिल सॉल्ट
- ६०४ चेंडू – ग्लेन मॅक्सवेल
- ६०९ चेंडू – आंद्रे रसेल / फिन अॅलन
भारताकडून सर्वात जलद १००० धावा करणारा ठरला दुसरा
भारताकडून आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १००० धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आघाडीवर आहे. त्याने २७ डावात अशी कामगिरी करून दाखवली होती. अभिषेक शर्मानं त्याच्यापेक्षा एक डाव अधिक घेत या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे.