सिडनी - पावसाने सातत्याने व्यत्यय आणलेल्या सिडनी कसोटीवर भारतीय संघाने पूर्णपणे वर्चस्व मिळवले आहे. कुलदीप यादवने टिपलेल्या पाच बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर गुंडाळला. तसेच पहिल्या डावात 322 धावांची आघाडी घेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला फॉलो ऑन खेळण्यास भाग पाडले आहे. पावसाच्या व्यत्ययानंतर खेळास सुरुवात झाल्यावर मोहम्मद शमीने पॅट कमिन्सची (25) विकेट काढत ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराने पीटर हँडस्कोंबला (37) माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का दिला. पाठोपाठ कुलदीप यादवने नाथन लायनची विकेट काढत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले. मात्र मिचेल स्टार्क ( नाबाद 29) आणि जोस हेझलवूड ( 21) यांनी शेवटच्या विकेटसाठी चिवट फलंदाजी करत संघाला 300 पार मजल मारून दिली. अखेरीस कुलदीप यादवने हेझलवूडची विकेट काढून ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला. भारताकडून कुलदीप यादवने 5, जडेजा आणि शमीने प्रत्येकी दोन तर बुमराने एक गडी टिपला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Ind vs Aus 4th test : कुलदीपचे पाच बळी, ऑस्ट्रेलियाला फॉलो ऑन
Ind vs Aus 4th test : कुलदीपचे पाच बळी, ऑस्ट्रेलियाला फॉलो ऑन
पावसाने सातत्याने व्यत्यय आणलेल्या सिडनी कसोटीवर भारतीय संघाने पूर्णपणे वर्चस्व मिळवले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2019 10:24 IST
Ind vs Aus 4th test : कुलदीपचे पाच बळी, ऑस्ट्रेलियाला फॉलो ऑन
ठळक मुद्देपावसाने सातत्याने व्यत्यय आणलेल्या सिडनी कसोटीवर भारतीय संघाने पूर्णपणे वर्चस्व मिळवले आहेकुलदीप यादवने टिपलेल्या पाच बळींच्या जोरावर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर गुंडाळलापहिल्या डावात 322 धावांची आघाडी घेत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला फॉलो ऑन खेळण्यास भाग पाडले