IND vs AUS T20 2022 Live Match - कॅमेरून ग्रीनचा ( Cameron Green) तडाखा पाहून ऑस्ट्रेलिया आज धावांचा डोंगर उभा करेल असेच चित्र होते. पण, अक्षर पटेल ( Axar Patel) व युजवेंद्र चहल यांनी भारताला पुनरागमन करून दिले. त्यात ग्लेन मॅक्सवेलच्या ( Glenn Maxwell) विकेटने सामन्यात थोडासा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. पण, अखेरच्या काही षटकांत टीम डेव्हिडने ( Tim David) भारतीय गोलंदाजांना धु धु धुतले...
Dinesh Karthikला रोहित झापणार होता, अक्षरच्या मेहनतीवर फिरवलेले पाणी; अम्पायरमुळे मिळाली विकेट
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताना प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला. रिषभ पंत याच्याजागी आज रोहितने अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारला पुन्हा संघात इन केले. कॅमेरून ग्रीनने वादळी खेळी करून भारतीय गोलंदाजांना पळता भुई करून सोडले होते. ऑसी आज धावांचा डोंगर उभा करतील असे वाटत असताना अक्षर पटेल गेम चेंजर ठरला. ग्रीनने १९ चेंडूंत अर्धशतक झळकावले. भुवनेश्वर कुमारने पाचव्या षटकात ग्रीनची विकेट मिळवली. ऑसी फलंदाज २१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा करताना लोकेश राहुलच्या हाती झेलबाद झाला.
हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर अक्षरने ७व्या षटकात पॉइंटला स्टीव्ह स्मिथचा झेल टाकला. स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल ही नवी जोडी खेळपट्टीवर असल्याने भारतीय गोलंदाजांना दडपण निर्माण करण्याची संधी मिळाली. युजवेंद्र चहलच्या ८व्या षटकात मॅक्सवेलने चेंडू चांगला टोलवला, परंतु सीमारेषेवर अक्षरने तो अडवला आणि डायरेक्ट हिट करून मॅक्सवेलला रन आऊट करून माघारी जाण्यास भाग पाडले. पण, त्यातही ट्विस्ट पाहायला मिळाले. चेंडू बेल्सवर आदळण्यापूर्वी एक बेल्स दिनेश कार्तिकच्या ग्लोव्ह्जला लागून आधीच खाली पडली होती. मॅक्सवेलला ( ६) माघारी जावे लागले.
मुंबई इंडियन्समुळे चर्चेत आलेल्या टीम डेव्हिडने भुवीच्या १८व्या षटकात २१ धावा कुटल्या. डॅनिएल सॅम्सनेही हात साफ केले. डेव्हिड व सॅम्स यांनी २८ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. जसप्रीतने ४ षटकांत ५० धावा दिल्या. डेव्हिडने २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचून २५ चेंडूंत पहिले अर्धशतक झळकावले. तो २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाने ७ बाद १८६ धावा केल्या.