IND vs AUS T20 2022 Live Match - ऑस्ट्रेलियाच्या १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व लोकेश राहुल स्वस्तात माघारी परतले. पण, विराट कोहली ( Virat Kohli) व सूर्यकुमार यादव ( surayakumar yadav) यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताच्या विजयाचा पाया रचला. सूर्यकुमार व विराट या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर हार्दिक पांड्याने त्याचे काम केले. भारताने ०-१ अशा पिछाडीवरून ही मालिका २-१ अशी जिंकताना विश्वविक्रम केला.
१० चेंडूंत ५० धावा! Suryakumar Yadavचा नाद खुळा खेळ, विराट कोहलीसह शतकी भागीदारी, Video
कॅमेरून ग्रीनचा ( Cameron Green) तडाखा पाहून ऑस्ट्रेलिया आज धावांचा डोंगर उभा करेल असेच चित्र होते. पण, अक्षर पटेल ( Axar Patel) व युजवेंद्र चहल यांनी भारताला पुनरागमन करून दिले. त्यात ग्लेन मॅक्सवेलच्या ( Glenn Maxwell) विकेटने सामन्यात थोडासा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. अखेरच्या काही षटकांत टीम डेव्हिडने ( Tim David) भारतीय गोलंदाजांना धु धु धुतले आणि तगडे आव्हान उभे केले. कॅमेरून ग्रीनने २१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा चोपल्या. टीम डेव्हिड २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला. सॅम्स २८ धावांवर नाबाद राहिला. भुवीने ३ षटकांत ३९ ( १ विकेट) धावा, जसप्रीतने ४ षटकांत ५० धावा दिल्या. अक्षरने ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहलनेही २२ धावांत १ विकेट घेतली.
आता भारताला ४ चेंडूंत ५ धावा हव्या होत्या आणि दिनेश कार्तिकने एक धाव घेतली. हार्दिकने चौकार खेचून विजय पक्का केला. हार्दिक १६ चेंडूंत २५ धावांवर नाबाद राहिला. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक २१ ट्वेंटी-२० सामने जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला. त्यांनी पाकिस्तानचा २० विजयाचा विक्रम मोडला.