IND vs AUS, 3rd ODI, Rohit Sharma hundred, Virat Kohli fifty set up India's consolation win vs Australia : रोहित शर्माच्या भात्यातून आलेली नाबाद शतकी खेळी आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिसरा वनडे सामना ९ विकेट्स राखून सहज खिशात घातला. भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यातील पराभवासह मालिका गमावली, पण व्हाइट वॉशची नामुष्की टाळताना रोहित-विराट जोडीनं खास शो दाखवत ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेचा शेवट गोड केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उलट सुलट चर्चेला ब्रेक! रोहित-विराट जोडीनं ऑस्ट्रेलियातील अखेरचा सामना केला अवस्मरणीय
रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीसाठी ऑस्ट्रेलिया दौरा खास होता. कारण यानंतर पुन्हा ते ऑस्ट्रेलियन मैदानात खेळताना दिसणार नाहीत. मालिका गमावल्यानंतर व्हाइट वॉशची नामुष्की टाळताना दोघांनी मिळून शेवटचा सामना एकदम खास अविस्मरणीय केला. आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत ही जोडी खेळणार की, नाही? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वनडे कारकिर्दीतील भविष्यासंदर्भात ज्या उलट सुलट चर्चा रंगत आहेत त्या चर्चेला ब्रेक लावणारी खेळी या दोघांनी सिडनीच्या मैदानात साकारली.
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
हिटमॅनचं शतक, किंग कोहलीनं चौकार मारत संपवली मॅच
ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना ४६.१ षटकात २३६ धावा करत टीम इंडियासमोर २३७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना शुबमन गिल आणि रोहित शर्मानं भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताच्या धावफलकावर ६९ धावा असताना गिलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का बसला. त्याने शुबमन गिलनं २६ चेंडूत २४ धावांची खेळी केली. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या विराट कोहलीनं आपला क्लास दाखवत ऑस्ट्रेलियाला बॅकफुटवर ढकलले. रोहितनं दमदार शतक झळकावले. दुसऱ्या बाजूला नाबाद अर्धशकी खेळी करणाऱ्या विराट कोहलीनं ३९ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार मारत मॅच संपवली. रोहित शर्मानं या सामन्यात १२५ चेंडूत १३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद १२१ धावांची खेळी केली. दोन सामन्यात शून्यावर बाद झालेल्या विराट कोहलीनं ७ चौकाराच्या मदतीने ८१ चेंडूत ७४ धावांची नाबाद खेळ साकारली.