India vs Australia 3rd ODI Live Update Marathi : ही खेळपट्टी हाय वे सारखी असल्याची टीका माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केली. कारण, ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना दिसले. डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन यांनी वैयक्तिक अर्धशतकं झळकावताना अबकी बार ४०० पार असाच खेळ केला होता. मार्शचे शतक अवघ्या ४ धावांनी हुकले. पण, भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये चांगले कमबॅक केले अन् ऑसींच्या विकेट्स घेतल्या.
Funny Video! सूर्य तापला, स्मिथ खूर्चीवर बसला! Virat Kohli भलत्याच मूडमध्ये दिसला
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मिचेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नर पोषक खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलला अन् पहिल्या विकेटसाठी ७८ धावा जोडल्या. प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्याच षटकात वॉर्नरने १९ धावा कुटल्या, परंतु पुढच्या षटकात कृष्णाला स्कूप मारण्याच्या प्रयत्नात वॉर्नर झेलबाद झाला. वॉर्नरने ३४ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ५६ धावा चोपल्या. मार्श व स्टीव्ह स्मिथ यांनी फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर दणदणीत फटकेबाजी केली. समालोचक रवी शास्त्री यांनी रायपूरच्या खेळपट्टीचा उल्लेख हाय वे असा केला... गोलंदाजांना इथे काहीच मदत मिळत नव्हती.