Join us

WHAT A BALL! कुलदीप यादवचा 'मॅजिक बॉल' अन् ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे 'वाजले बारा'

ind vs aus live match : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील निर्णायक वन डे सामना खेळवला जात आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 17:26 IST

Open in App

ind vs aus 3rd ODI live, Kuldeep Yadav Alex Carey । चेन्नई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वन डे मालिकेतील आज अखेरचा सामना चेन्नई येथे खेळवला जात आहे. तिसर्‍या वन डे सामन्यात चायनामन 'कुलदीप यादव'ने ऑस्ट्रेलियाच्या लेक्स कॅरीला ज्या पद्धतीने बाद केले, तो चेंडू या वर्षातील सर्वोत्तम चेंडू मानला जात आहे. खरं तर ऑस्ट्रेलियाच्या डावातील 39व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुलदीप यादवने कॅरीचा त्रिफळा उडवला. कुलदीपचा चेंडू खेळपट्टीवर आदळला आणि फलंदाजाला हुलकावणी देऊन थेट स्टम्पमध्ये घुसला. 

दरम्यान, आपला त्रिफळा उडाला आहे यावर खुद्द कॅरीचा देखील विश्वास बसत नाही. कुलदीपच्या या चेंडूची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे. कुलदीपचा हा करिश्माई चेंडू डाव्या हाताच्या फलंदाजासाठी खूपच घातक ठरतो. सोशल मीडियावर कुलदीप यादवच्या या अप्रतिम चेंडूचे खूप कौतुक होत आहे. 

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी. 

आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, मार्नस लाबूशेन, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, ॲश्टन अगर, शॉन ॲबॉट, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाकुलदीप यादवसोशल व्हायरलसोशल मीडिया
Open in App