Join us  

IND vs AUS : मालिकेचा निर्णय आज! रोमहर्षक लढतीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया सज्ज

मालिका विजयासाठी दोन्ही संघ अखेरच्या सामन्यात सर्व ताकद पणाला लावून खेळतील, यात शंका नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 4:18 AM

Open in App

बंगलोर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. वानखेडे मैदानावर पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राजकोटमध्ये भारताने ३६ धावांनी विजय मिळवून दमदार पुनरागमन केले. अखेरचा सामना आज, रविवारी बंगलोर येथील चिन्नास्वामी मैदानावर होणार आहे. मालिका विजयासाठी दोन्ही संघ अखेरच्या सामन्यात सर्व ताकद पणाला लावून खेळतील, यात शंका नाही.दुसऱ्या वनडेत भारताने फलंदाजी संयोजन सुधारले. लोकेश राहुल याने पाचव्या स्थानावर खेळून संधीचा लाभ घेतला. रोहित शर्मा- शिखर धवन यांनी डावाची शानदार सुरुवात केल्यानंतर विराट कोहलीने स्वत:च्या पसंतीच्या तिसºया स्थानावर शानदार कामगिरी केली. निर्णायक सामन्यात फलंदाजीचा हाच क्रम कायम राहणार आहे.

रोहित शुक्रवारी क्षेत्ररक्षणादरम्यान जखमी झाला होता. तथापि तो चिन्नास्वामीवर खेळेल, असा विश्वास कोहलीने व्यक्त केला आहे. धवनच्या पासळ्यांना कमिन्सचा चेंडू लागला होता. त्यामुळे आॅस्ट्रेलियाच्या डावात तो क्षेत्ररक्षणाला आला नव्हता. बीसीसीआयने रोहित आणि शिखर यांच्या खेळण्याचा निर्णय सामन्याआधी घेण्यात येईल, असे म्हटले आहे. जखमी ऋषभ पंत याच्याजागी मनीष पांडे याला संधी मिळणार आहे. राजकोट सामन्याचे वैशिष्ट्य ठरले ती पाचव्या स्थानावर आलेल्या राहुलची खेळी. यामुळे संघात संतुलन साधण्यास मदत होईल.गोलंदाजीत बदल होईल, असे वाटत नाही. तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाज संघात असतील. कुलदीपने काल सर्वोत्कृष्ट कामगिरी करीत विजयात योगदान दिले. चिन्नास्वामी हे आयपीएलमध्ये युजवेंद्र चहलचे स्थानिक मैदान असल्याने कुलदीपसह त्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. जखमेतून सावरलेल्या बुमराहचा धोकादायक मारा, हे सकारात्मक म्हणावे लागेल. त्याच्या दडपणामुळे दुसºया टोकाहून फलंदाज बाद होत गेले. मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी यांनीही अखेरच्या षटकात उत्कृष्ट मारा केला. आॅस्ट्रेलिया संघात बदल करेल, असे वाटत नाही. डावखुरा एश्टन एगर याच्यापुढे मात्र कामगिरी सुधारण्याचे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणारभारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी.ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), अ‍ॅलेक्स केरी (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, सीन एबोट, एश्टन एगर, पीटर हॅन्ड्सकोम्ब, जोश हेजलवुड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, एशटन टर्नर, डेव्हिड वार्नर आणि अ‍ॅडम झम्पा.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलिया