Join us

IND vs AUS 2nd T20I : 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा! मग ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवली मॅच

दुसऱ्या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत  १-० अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:25 IST

Open in App

ND vs AUS 2nd T20I मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियन संघानं भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. ५ सामन्यांच्या टी २० मालिकेत दुसऱ्या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत  १-० अशी आघाडी घेतली आहे. नाणफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करताना जोस हेजलवूडनं पॉवर प्लेमध्ये जलवा दाखवला. आपल्या स्पेलमधील पहिल्या ३ षटकात ३ विकेट घेत त्याने टीम इंडियाचे कंबरडे मोडले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अभिषेक शर्माच्या भात्यातून दमदार अर्धशतक, पण...

सलामीवीर अभिषेक शर्मानं संघाचा डाव सावरताना विक्रमी अर्धशतक झळकावले. पण शेवटी ते व्यर्थ ठरले. कारण दुसऱ्या बाजूनं त्याला कुणाचीही साथ मिळाली नाही. परिणामी भारतीय संघाचा डाव १८.४ षटकात १२५ धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने ६ विकेट गमावल्या पण सामना ८० चेंडूत संपवत मालिकेत आघाडी घेतली आहे.

Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी छोट्याखानी खेळीसह अभिषेक शर्माचं अर्धशतक ठरवलं व्यर्थ

भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रॅविस हेड जोडीनं पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचली. वरुण चक्रवर्तीनं हेडला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने १५ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २८ धावा केल्या. याशिवाय टीम डेविडही वरुण चक्रवर्तीच्या फिरकीच्या जाळ्यात फसला. भारताकडून कुलदीप यादवनं मिचेल मार्श ४६ (२६) आणि जॉश इंग्लिस २० (२०) यांच्या रुपात दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. सामना संपत आल्यावर बुमराहनं मिचेल ओव्हन १४ (१०) आणि मॅथ्यू शॉर्ट यांच्या रुपात दोन विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या. पण या धावांचा बचाव करण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियन संघाकडून एकही अर्धशतक आले नाही. पण प्रत्येकाने छोट्याखानी खेळीसह  अभिषेक शर्माचे विक्रम शतक व्यर्थ ठरवले. ऑस्ट्रेलियाने हा सामना ८० चेंडूत जिंकला.

English
हिंदी सारांश
Web Title : Australia Dominates India in 2nd T20I, Takes Series Lead

Web Summary : Australia defeated India in the second T20I, taking a 1-0 series lead. Hazlewood's powerplay performance crippled India. Abhishek Sharma's half-century was in vain as India collapsed for 125. Australia chased the target in 80 balls despite losing 6 wickets.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअभिषेक शर्माभारतीय क्रिकेट संघ