IND vs AUS 2nd T20 Abhishek Sharmas Record Breaking Fifty : मेलबर्नच्या मैदानातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर सलामीवीर अभिषेक शर्मानं आपल्या शैलीत तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश केला. एका मागून एक विकेट पडत असताना या पठ्ठ्यानं  ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पहिले अर्धशतक झळकावताना विक्रमी फिफ्टी ठोकली.  त्याने २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियन मैदानात त्याच्या भात्यातून आलेले  टी-२० तील भारतीय फलंदाजाने केलेली संयुक्तरित्या सर्वात जलद अर्धशतक ठरले. 
 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 
जलद अर्धशतकी खेळीसह केली सूर्यकुमार यादवच्या विक्रमाची बरोबरी
 
या आधी ऑस्ट्रेलियन मैदानात सर्वात जलद अर्धशतक झळकवणाऱ्या भारतीय बॅटरच्या यादीत सूर्यकुमार यादव टॉपला होता. त्याने २०२२ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मेलबर्नच्या मैदानात झिम्बाब्वे विरुद्ध २३ चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आता अभिषेकनं ऑस्ट्रेलियन संघासमोर अवघ्या २३ चेंडूत अर्धशतकी डाव साधत सूर्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याच्या या खेळीची खासियत म्हणजे संघ अडचणीत असताना तो एकटा ऑस्ट्रेलियन गोलंदाजाना नडला. नॅथन एलिस खेळीला ब्रेक लावण्याआधी अभिषेक शर्मानं ३७ चेंडूत ६८ धावा केल्या. या खेळीत त्याच्या भात्यातून ८ चौकार आणि २ उत्तुंग षटकार पाहायला मिळाले.
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
अभिषेक अन् हर्षित वगळता एकालाही गाठता आला नाही दुहेरी आकडा
अभिषेक शर्माशिवाय हर्षित राणानं  ३३ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने केलेल्या ३५ धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला या सामन्यात दुहेरी आकडा गाठता आला नाही.  अभिषक शर्माची विकेट पडल्यावर भारतीय संघ २० षटकेही खेळू शकला नाही. १८.४ षटकात भारताचा डाव १२५ धावांत आटोपला.
सर्वाधिक वेळा २५ पेक्षा कमी चेंडूत अर्धशतक झळकवण्याचाही साधला डाव
 
 अभिषेक शर्मानं ८ वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यात ७ वेळा त्याने २५ पेक्षा कमी चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. या यादीत फिल सॉल्ट दुसऱ्या स्थानावर आहे. ११ पेकी ७ वेळा त्याने २५ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे.  एव्हिन लुईस २५ पैकी  ७ वेळा तर सूर्यकुमार यादवनं २५ पैकी ७ वेळा २५ पेक्षा कमी चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली आहे.