Rohit Sharma Record Alert, IND vs AUS 2nd ODI: भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. त्यातच पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी २६ षटकांचा करण्यात आला. भारताने १३६ धावांपर्यंत मजल मारली. तर ऑस्ट्रेलियाने २२व्या षटकांतच आव्हान पूर्ण केले. भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला एक विक्रम खूणावत होता, पण पहिल्या सामन्यात रोहित केवळ ८ धावा करू शकला. त्यामुळे आता त्याला दुसऱ्या सामन्यात एक मोठा पराक्रम करण्याची संधी आहे.
IPL स्पर्धेनंतर क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या रोहित शर्माकडून भारतीय चाहत्यांना पहिल्या सामन्यात खूप अपेक्षा होत्या. वनडे संघाचे कर्णधारपद गेल्यानंतर रोहित वेगळ्याच ऊर्जेने मैदानात उतरला होता. त्याने तब्बल १० ते १५ किलो वजनही कमी केले. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. एका चौकारासह ८ धावा काढून तो बाद झाला. आता दुसऱ्या सामन्यात रोहितला एक मोठा पराक्रम करण्याची संधी आहे. रोहितने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत २० वनडे सामन्यात ९९८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर १००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी त्याला केवळ २ धावांची गरज आहे. असे केल्यावर ऑस्ट्रेलियात १००० धावा करणारा रोहित शर्मा भारताचा पहिला सामना ठरेल.
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक वनडे धावा करणारे भारतीय
रोहित शर्मा- ९९८ धावा
विराट कोहली- ८०२ धावा
सचिन तेंडुलकर- ७४० धावा
महेंद्रसिंग धोनी- ६८४ धावा
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियातील वनडे कारकीर्द
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत २० वनडे सामने खेळले आहेत. त्यात चार शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेमध्ये रोहितला सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रमही करता येऊ शकणार आहे. वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा ३४४ षटकारांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर पाकिस्तानी माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ३५१ षटकारांसह अव्वल आहे.