रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी केलेल्या शतकी भागीदारीनंतर अक्षर पटेलच्या उपयुक्त धावा आणि तळाच्या फलंदाजीत हर्षित राणाने फलंदाजीत दाखवलेली धमक याच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ९ बाद २६४ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ॲडम झाम्पानं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याची ही कामगिरी गौतम गंभीर याने कुलदीप यादवला बाकावर बसवून वॉशिंग्टन सुंदरवर खेळलेला डाव फसवा ठरवणारी आहे का? असा प्रश्न निर्माण करणारी आहे.
रोहित-श्रेयस अय्यरची अर्धशतके, अखेरच्या षटकात हर्षित राणाची फटकेबाजी
९ चेंडूत ९ धावांवर परतल्यावर त्याची जागा घेण्यासाठी आलेला विराट कोहली ४ चेंडूचा सामना करून खातेही न उघडता तंबूत परतला. १७ धावांवर भारतीय संघाने दोन विकेट्स गमावल्या होत्या. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी रचत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले. रोहित शर्मा ९७ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकार मारून ७३ धावांवर बाद झाला. झाम्पानं ६१ धावांवर श्रेयस अय्यरच्या खेळीला ब्रेक लावला. अक्षर पटेलनं केलेल्या ४४ धावा आणि तळाच्या फलंदाजीत हर्षित राणानं १८ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने केलेल्या नाबाद २४ धावांच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात ९ बाद २६४ धावांपर्यंत मजल मारली.
Web Summary : India scored 264/9, powered by Rohit and Iyer's partnership, plus contributions from Axar and Harshit. Zampa's four wickets raise questions about Gambhir's decision to favor Sundar over Kuldeep.
Web Summary : रोहित और अय्यर की साझेदारी और अक्षर और हर्षित के योगदान से भारत ने 264/9 रन बनाए। ज़म्पा के चार विकेट गंभीर के कुलदीप पर सुंदर को तरजीह देने के फैसले पर सवाल उठाते हैं।