IND vs AUS 1st T20 : टीम इंडियानं टॉस जिंकला! नव्या चेहऱ्यांना संधी; 'सूर्या'च्या खांद्यावर भारताची मदार

IND vs AUS live Match : आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 06:36 PM2023-11-23T18:36:41+5:302023-11-23T18:36:52+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 1st T20 Indian team captain Suryakumar Yadav has won the toss and elected to bowl first | IND vs AUS 1st T20 : टीम इंडियानं टॉस जिंकला! नव्या चेहऱ्यांना संधी; 'सूर्या'च्या खांद्यावर भारताची मदार

IND vs AUS 1st T20 : टीम इंडियानं टॉस जिंकला! नव्या चेहऱ्यांना संधी; 'सूर्या'च्या खांद्यावर भारताची मदार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AUS 1st T20 Match Live Updates | विशाखापट्टनम : वन डे विश्वचषकाचा थरार संपला असून आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट ट्वेंटी-२० क्रिकेटकडे वळले आहे. कारण पुढील वर्षी ट्वेंटी-२० विश्वचषक होणार असून त्याच्या तयारीसाठी भारतीय संघ ११ ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. आजपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्याच्या मालिकेला सुरूवात होत आहे. विशाखापट्टनम येथे होत असलेल्या या सलामीच्या सामन्यासाठी भारतीय संघात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडिया कांगारूंशी भिडत आहे. खरं तर 'सूर्या' पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करत आहे. आजच्या सामन्यासाठी नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, विश्वचषक खेळलेल्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पण, सूर्यकुमार यादवला विश्वचषकात कमी संधी मिळाली होती. एक ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट म्हणून सर्वदूर डंका असलेल्या 'सूर्या'वर भारतीय संघाची मदार असणार आहे. सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी आहे, तर ऋतुराज गायकवाडकडे उप कर्णधारपदाची धुरा आहे.

आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा. 

आजच्या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -
मॅथ्यू वेड (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, अॅरॉन हार्डी, मार्कस स्टॉयनिस, टिम डेव्हिड, शॉन बॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी भारतीय संघ -
सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.

Web Title: IND vs AUS 1st T20 Indian team captain Suryakumar Yadav has won the toss and elected to bowl first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.