भारतीय संघाचा 'जानी दुश्मन' ट्रॅविस हेड पुन्हा एकदा संघासाठी डोकेदुखी ठरतोय असं वाटत होते. पण वरुण चक्रवर्ती आला अन् त्याने आयसीसी स्पर्धेत सातत्याने टीम इंडियाच्या विजयाआड आलेल्या ट्रॅविस हेडला तंबूचा रस्ता दाखवला. दुबईच्या मैदानात रंगलेल्या सेमी फायनल लढतीत पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय घेतल्यावर ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळत झाली. मोहम्मद शमीच्या पहिल्याच चेंडूवर ट्रॅविस हेडच्या कॅचची संधी निर्माण झाली होती. पण शमीची फॉलो थ्रोमधील कॅचची संधी हुकली. त्यानंतर ट्रॅविस हेड चांगलाच तापला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुन्हा तो डोकेदुखी ठतोय की काय? अस चित्र निर्माण झालं होते
मोहम्मद शमीनं चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना खेळणाऱ्या कूपर कॉनोली याच्या रुपात टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिले. पण दुसऱ्या बाजूला ट्रॅविस हेडनं आपला तोरा दाखवलाय सुरुवात केली. पहिल्या काही चेंडूवर चाचपडत खेळणाऱ्या ट्रॅविस हेडच्या भात्यातून फटकेबाजीला सुरुवात झाली. आता पुन्हा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणार असे चित्र निर्माण झाले होते.
पण वरुण चक्रवर्तीसमोर त्याच काहीच नाही चालले
पण वरुण चक्रवर्ती आला अन् त्याने आपल्या चक्रव्यूहात जानी दुश्मनला फसवलं. ऑस्ट्रेलियाच्या डावातील ९ व्या षटकातील वरुण चक्रवर्ती घेऊन आलेल्या दुसऱ्या चेंडूवर हेडनं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. शुबमन गिलनं कोणतीही चूक न करता त्याचा कॅच पकडला. ट्रॅविस हेडनं ३३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकाराच्या मदतीने ३९ धावांची खेळी केली.