Join us

IND vs AUS 1st ODI : रोहितच्या अनुपस्थितीत ओपनिंग कोण करणार? हार्दिक पांड्याने सांगितला त्याचा प्लान, दोन द्विशतकवीर सोबत उतरणार 

India Playing XI vs Australia: बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 17:41 IST

Open in App

India Playing XI vs Australia: बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. वानखेडे स्टेडियमवर पहिला वन डे सामना शुक्रवारी खेळवला जाणार आहे.श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांनी दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतलेली आहे. रोहित शर्मा कौटुंबिक कारणास्तव पहिला सामना खेळणार नाही आणि हार्दिक पांड्या वानखेडेवर नेतृत्व करताना दिसेल. रोहितच्या अनुपस्थिती ओपनिंगला कोण येणार याची सर्वांना उत्सुकता होती आणि कर्णधार हार्दिकने त्याचे उत्तर दिले.

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत इशान किशन आणि शुबमन गिल ही जोडी पहिल्या वन डेत सलामीला खेळताना दिसेल, असे हार्दिकने सामन्याच्या पूर्वसंध्येला स्पष्ट केले. इशान किशन आणि शुबमन गिल या दोघांनी नुकतंच वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे आणि या दोन द्विशतकवीरांना एकत्र खेळताना पाहण्याची संधी उद्या वानखेडे स्टेडियमवर मिळणार आहे. श्रेयस नसल्याने सूर्यकुमार यादवला वन डे संघात संधी मिळेल आणि लोकेश राहुल मधल्या फळीत खेळू शकतो. वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्यापैकी कोण खेळेल याची उत्सुकता आहे.  'ट्विट पाहण्यासाठी क्लिक करा' 

२०२३ चा वन डे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन भारतासाठी ही तीन सामन्यांची वन डे मालिका महत्त्वाची आहे. इशान किशनने डिसेंबरमध्ये वन डेत द्विशतक झळकावले होते आणि शुबमनने न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे सामन्यात द्विशतकी खेळी केली होती. सूर्यकुमार यादवचे प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणे निश्चित मानले जात आहे. कर्णधार हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा फिनिशरची भूमिका बजावताना दिसतील.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन - शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर/शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव/युजवेंद्र चहल. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाहार्दिक पांड्याइशान किशनशुभमन गिल
Open in App