Join us

VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...

...अन् अभिषेक नायरला खटकली रोहित-गिलच्या फ्रेममधील ती गोष्ट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 18:57 IST

Open in App

IND vs AUS 1st ODI, Arey Bhai Usse Popcorn Mat De Abhishek Nayar’s Hilarious Reaction to Rohit Sharma's Dressing Room Video : पर्थच्या मैदानातील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या लढतीनं भारतीय वनडेतील नव्या पर्वाची सुरुवात झाली. माजी कर्णधार रोहित शर्मा शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. माजी-आजी कर्णधारांनीच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताच्या डावाला सुरुवात केली. पहिल्या सामन्यात दोघांचाही फ्लॉप शो पाहायला मिळाला. फिल्डवर दोघेही अपयशी ठरले, पण पावसाच्या बॅटिंग वेळी या जोडीनं ड्रेसिंग रुममध्ये एकमेकांसोबत 'बोलंदाजी' करत दाखवलेला गोडवा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

...अन् अभिषेक नायरला खटकली रोहित-गिलच्या फ्रेममधील ती गोष्ट  

एकदिवसीय सामन्याची सूत्रे हाती घेतल्यावर शुबमन गिल आपल्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कर्तृत्ववान माजी कर्णधारासोबत दिर्घ चर्चा करताना दिसले. पण या दोघांत तिसरा दिसला अन् रोहित शर्माच्या फिटनेसवर काम करणाऱ्या अभिषेकला ती गोष्ट खटकली. समालोचन करत असताना अभिषेक शर्मानं ती गोष्ट बोलूनही दाखवली. एवढेच नाही तर स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्येही तो यावर बोलला. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर स्टोरी

IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

"अरे भाई उसे पॉपकॉर्न मत दे" अभिषेक नायरची रिअ‍ॅक्शन व्हायरल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थच्या मैदानातील वनडे सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल स्वस्तात माघारी फिरले. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबला त्यावेळी दोघे ड्रेसिंगरुममध्ये एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसून आले. यावेळी शुबमन गिलच्या हातात पॉपकॉर्न होता. शुबमन गिल पॉपकॉर्न रोहित सोबत शेअर करत असल्याचेही दिसून आले. ते पाहून अभिषेक नायर याने   "अरे भाई उसे पॉपकॉर्न मत दे" अशा शब्दांत प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर त्याची ही कमेंट चर्चेचा विषय ठरत आहे. 

आधी हिटमॅनच्या फिटनेसचा प्रवास सांगितला, त्याला पॉपकॉर्न खाताना बघून म्हणाला... 

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्मानं फिटनेसवर काम केलं आहे. तब्बल ११ किलो वजन कमी करून रोहित शर्मा मैदानात उतरला आहे. रोहित शर्मानं टीम इंडियाचा माजी सहाय्यक प्रशिक्षक राहिलेल्या मुंबईकर अभिषेक नायरच्या मार्गदर्शनाखालीच फिटनेवर काम केलं आहे. सातत्याने कठोर मेहनत घेताना रोहितनं खाण्यावरही नियंत्रण ठेवलं आहे. आवडता वडापावही तो खात नाही, ही गोष्टही अभिषेक नायरनं यावेळी बोलून दाखवली. पण पॉपकॉर्नमुळे आता ११ ऐवजी साडे दहा किलो वजन कमी केलंय, असेच म्हणावे लागेल, अशी मजेशीर कमेंट  अभिषेक नायरनं रोहित पॉपकॉर्न खाताना दिसल्यावर केली आहे. 

दोघांनी अशाच गप्पा माराव्यात, पण तो पॉपकॉर्न मात्र पुन्हा दिसायला नको  

स्टार स्पोर्ट्सच्या अधिकृत एक्स अकाउंट रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्यतील गप्पा गोष्टीसंदरभात विश्लेषण करणारा एक खास व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यातही अभिषेक नायरनं दोघांच्यातील बॉन्डिंगवर बोलताना गप्पा गोष्टी अशाच रंगत राहू देत, पण पॉपकॉर्न तेवढा नको, अशा धाटणीतील प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले. इरफान पठाण याने आजी-माजी कर्णधार जवळपास अर्धा तास एकमेकांसोबत गप्पा मारत बसले आहेत, असे सांगत यावर काय वाटते? असा प्रश्न अभिषेक नायरला विचारला होता. यावर तो म्हणाला की, हे चित्र बघून मला असं वाटतं की, नेतृत्वबदलानंतर शुबमन गिल हे सर्व रोहित शर्मासोबत असणारे पूर्वीसारखे बॉन्डिंग कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. ही चांगली गोष्ट आहे. फक्त दोघांच्यात तो पॉपकॉर्न नसावा, असे म्हणत रोहितनं फिटनेसवर घेतलेली मेहनत जंक फूडमुळे वाया जाऊ नये, अशी भावना अभिषेक नायरनं व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Sharma's diet: Abhishek Nayar hilariously reacts to popcorn indulgence.

Web Summary : Rohit Sharma, who lost weight by avoiding 'Vada Pav,' was spotted eating popcorn. Abhishek Nayar jokingly commented that Sharma might regain weight after pictures surfaced of him sharing popcorn with Shubman Gill. Nayar emphasized Sharma's hard work on fitness.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माशुभमन गिलभारतीय क्रिकेट संघ