Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AFG U19 Semifinal Live Streaming: वैभव सूर्यवंशीसह युवा टीम इंडिया फायनलसाठी शड्डू ठोकणार!

इथं एक नजर टाकुयात भारत-अफगाणिस्तान अंडर १९ संघातील सेमीफायनलची लढत कधी अन् कुठं पाहता येईल यासंदर्भातील माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 10:05 IST

Open in App

IND vs AFG  U19 World Cup 2026 Semifinal Live Streaming : पाच वेळचा अंडर १९ वर्ल्ड कप विजेता भारतीय संघाला यंदाच्या हंगामात जेतेपदाचा षटकार मारण्याची संधी आहे. यंदाच्या हंगामातील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघ बुधवारी हरारे येथील हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर  अफगाणिस्तान अंडर-१९ संघासमोर फायनलसाठी शड्डू ठोकणार आहे. या सामन्यात युवा स्फोटक बॅटर वैभव सूर्यवंशीवर पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा असतील. या सामन्यातील विजेता फायनलमध्ये पहिल्या सेमीफायनलमध्ये विजेत्या इंग्लंडविरुद्ध भिडेल. इंग्लंडने मंगळवारी ऑस्ट्रेलियाला २७ धावांनी पराभूत करत फायनल गाठली आहे. इथं एक नजर टाकुयात भारत-अफगाणिस्तान अंडर १९ संघातील सेमीफायनलची लढत कधी अन् कुठं पाहता येईल यासंदर्भातील माहिती

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!भारत vs अफगाणिस्तान सेमीफायनल सामना कधी आणि कुठं रंगणार?

भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील ICC अंडर-१९ वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सामना बुधवारी ४ फेब्रुवारी, २०२६ रोजी खेळवण्यात येणार आहे. हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारेच्या मैदानात रंगणारा हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी १ वाजता  सुरु होईल. अर्धा तास अगोदार दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.

U19 World Cup 2026 : ऑस्ट्रेलियाला रोखत इंग्लंडची फायनलमध्ये धडक; आता भारत-अफगाणिस्तान लढतीवर नजरा

 सामना कुठे पाहता येणार?

भारत-अफगाणिस्तान युवा संघातील सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय क्रिकेट चाहते जिओ हॉटस्टारवर अ‍ॅप आणि वेबसाइटवर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

भारतीय अंडर १९ संघ (India U 19 Squads)  

एरॉन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक फलंदाज), कनिष्क चौहान, आरएस आंब्रिश, खिलन पटेल, हेनिल पटेल, उद्धव मोहन, हरवंश पंगालिया, मोहम्मद एनान किशन, दीपेश देवेंद्रन.

अफगाणिस्तान अंडर १९ संघ  (Afghanistan U 19 Squads) उस्मान सादात, खालिद अहमदझाई, फैसल शिनोजादा, उझैरुल्ला नियाझाई, महबूब खान (यष्टीरक्षक/फलंदाज), अझीजुल्ला मियाखिल, अब्दुल अझीझ, रूहुल्ला अरब, नूरिस्तानी ओमरझाई, वाहिदुल्ला झदरन, अकील खान, नझीफुल्लाह अमीरी, खातीर स्टानिकझाई, सलामी खान, सलामी खान.

English
हिंदी सारांश
Web Title : India U-19 eyes World Cup final berth against Afghanistan.

Web Summary : India U-19 team faces Afghanistan in the World Cup semifinal. The winner will play England in the final. Vaibhav Suryavanshi will be key. Match live on Star Sports and Jio Hotstar.
टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक फायनलभारत-अफगाणिस्तानभारतीय क्रिकेट संघवैभव सूर्यवंशीआयुष म्हात्रे