IND vs ENG : पराभवानंतर इंग्लंडचा संघ सैरभैर; विराटची विकेट अन् १० चेंडूंत ५ षटकार खेचणारा खेळाडू संघाबाहेर  

England Squad for 3rd Test इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) हा संघ जाहीर केला. इंग्लंडनं पहिल्या कसोटीत २२७ धावांनी विजय मिळवला, परंतु टीम इंडियानं कमबॅक करताना दुसरी कसोटी ३१७ धावांनी जिंकली आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 16, 2021 04:12 PM2021-02-16T16:12:04+5:302021-02-16T16:12:40+5:30

whatsapp join usJoin us
IND v ENG 2021: England Announce 17-Member Squad for 3rd Test; Moeen Ali To Fly Back Home | IND vs ENG : पराभवानंतर इंग्लंडचा संघ सैरभैर; विराटची विकेट अन् १० चेंडूंत ५ षटकार खेचणारा खेळाडू संघाबाहेर  

IND vs ENG : पराभवानंतर इंग्लंडचा संघ सैरभैर; विराटची विकेट अन् १० चेंडूंत ५ षटकार खेचणारा खेळाडू संघाबाहेर  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England Test : भारतीय संघाकडून दुसऱ्या कसोटीत पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लंडचा संघ सैरभैर अवस्थेत गेल्याचं पाहायला मिळत आहे. २४ फेब्रुवारीपासून तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. चेन्नईतील पराभवानंतर इंग्लंडनं लगेच तिसऱ्या सामन्यासाठी १७ सदस्यीय संघ जाहीर केला. आश्चर्याची बाब म्हणजे या सदस्यांमध्ये चेपॉकवर दोन्ही डावांत विराट कोहलीची विकेट घेणाऱ्या आणि १० चेंडूंत पाच षटकार खेचणाऱ्या अष्टपैलू खेळाडू मोईन अली ( Moeen Ali) याचं नाव नाही. ( England Squad for 3rd Test) 'हिरो' वाली फिलिंग!; आर अश्विननं हा विजय केला चेन्नईच्या प्रेक्षकांना समर्पित

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) हा संघ जाहीर केला. इंग्लंडनं पहिल्या कसोटीत २२७ धावांनी विजय मिळवला, परंतु टीम इंडियानं कमबॅक करताना दुसरी कसोटी ३१७ धावांनी जिंकली आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. नव्यानं तयार झालेल्या मोटेरा स्टेडियमवर  पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे आणि तो मान इंग्लंड-भारत यांना मिळाला. या सामन्यासाठी इंग्लंडनं संघात जॉन बेअरस्टो ( Jonny Bairstow) याची निवड केली आहे. त्याच्याव्यतिरिक्त जोफ्रा आर्चरही संघात पुनरागमन करणार आहे. दुखापतीमुळे त्याला दुसऱ्या सामन्याला मुकावे लागले होते. विराट कोहलीवर एका सामन्याच्या 'बंदी'ची टांगती तलवार; तिसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणे नेतृत्व करणार?

सलामीवीर झॅक क्रॅवली याचाही समावेश आहे. त्याला दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागले होते. अष्टपैलू खेळाडू मोईन अली मायदेशी परतणार आहे आणि त्यामुळे उर्वरित दोन कसोटीत तो नसेल. मोईन अलीच्या जागी डॉम बेस याचे पुनरागमन होत आहे.  आर अश्विननं मोडला MS Dhoniचा विक्रम, चेन्नई कसोटी गाजवत नोंदवले अनेक पराक्रम!

इंग्लंडचा संघ ( England squad for the 3rd Test vs India in Ahmedabad) - जो रूट, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, डॉमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, झॅक क्रॅवली, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, ऑली पोप, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स, मार्क वूड  
 

Web Title: IND v ENG 2021: England Announce 17-Member Squad for 3rd Test; Moeen Ali To Fly Back Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.