Join us
Daily Top 2Weekly Top 5

Vaibhav Suryavanshi Record : U19 वर्ल्ड कपमध्ये वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम; इथंही विक्रमांची ‘वैभवशाही’ परंपरा कायम

प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळताच वैभव सूर्यवंशीच्या नावे झाला नवा विश्वविक्रमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 14:27 IST

Open in App

Vaibhav Suryavanshi Creates History In Under 19 World Cup : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अमेरिकेविरुद्धच्या लढतीनं १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या (ICC Under 19 World Cup 2026) मोहिमेची सुरुवात केली आहे. झिम्बाब्वेतील बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब मैदानात रंगणाऱ्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरल्यावर १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ICC U19 वर्ल्ड कपच्या इतिहासात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळताच वैभव सूर्यवंशीच्या नावे झाला नवा विश्वविक्रमी

युवा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हमध्ये संधी मिळताच वैभव सूर्यवंशीने इतिहास रचला. त्याने तब्बल १६ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडीत काढला. वैभव सूर्यवंशी हा अंडर-१९ वर्ल्ड कपच्या इतिहासात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा जगातील सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे.

टी-२० नंतर आता वनडेतूनही निवृत्तीची वेळ? टीम इंडियासाठी खलनायक ठरतोय ‘हा’ स्टार क्रिकेटर

झिम्बाब्वेच्या भूमीवर वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम

अमेरिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या अंडर १९ वर्ल्ड कप २०२६ च्या सलामीच्या लढतीत वैभव सूर्यवंशीने १४ वर्षे २९४ दिवस या वयात मैदानात पाऊल ठेवत इतिहास रचला. त्याने कॅनडाच्या नितीश कुमारचा विक्रम मोडला.  २०१० मध्ये या खेळाडूनं १५ वर्षे २४५ दिवसांच्या वयात U19 वर्ल्ड कपमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते.

वर्ल्ड कप आधी नेतृत्वासह दाखवले होते फलंदाजीतील कर्तृत्व 

अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेआधी युवा भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली. या मालिकेत वैभव सूर्यवंशीनं भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. अंडर १९ मध्ये सर्वात कमी वयात एखाद्या संघाचा कर्णधार होण्याचा विक्रमही त्यावेळी वैभव सूर्यवंशीनं आपल्या नावे केला. एवढेच नव्हे तर फलंदाजीतील धमाकेदार शोसह त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला घरच्या मैदानात ३-० असे चारीमुंड्या चित केले होते. 

IPL मधून सुरु झाली 'वैभवशाही' विक्रमांची परंपरा

IPL २०२५ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या संघाकडून खेळताना १४ वर्षी पोरानं क्रिकेट जगतातील स्टार गोलंदाजांसमोर तुफान फटकेबाजीचा खास नजराणा पेश केला. IPL मधील शतकासह त्याने क्रिकेट जगताचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. अंडर १९ संघापासून ते इंडिया अ संघात मिळालेल्या संधीच सोनं करताना त्याने आपल्या भात्यातील धमाक्यावर धमाका दाखवून देत प्रत्येक स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले. ही परंपरा U19 वर्ल्ड कप स्पर्धेतही कायम राहिली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vaibhav Suryavanshi's record: Youngest player in U19 World Cup history.

Web Summary : Vaibhav Suryavanshi, 14, made history as the youngest player to represent his country in the U19 World Cup, breaking a 16-year-old record. He previously captained the U19 team and excelled in the IPL, continuing his record-breaking spree.
टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपवैभव सूर्यवंशीभारतीय क्रिकेट संघआयुष म्हात्रे