वादळी खेळीसह वैभव सूर्यंवशीने सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड! सुरेश रैनाला टाकले मागे

सुरेश रैनापेक्षा भारी ठरली वैभव सूर्यंवशीची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 18:46 IST2025-07-03T18:46:07+5:302025-07-03T18:46:58+5:30

whatsapp join usJoin us
IND U19 vs ENG U19 India U 19 Vaibhav Suryavanshi Broke 21 Year Old Suresh Raina Record vs England U19 | वादळी खेळीसह वैभव सूर्यंवशीने सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड! सुरेश रैनाला टाकले मागे

वादळी खेळीसह वैभव सूर्यंवशीने सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड! सुरेश रैनाला टाकले मागे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND-U19 vs ENG-U19 :  १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या १९ वर्षीय भारतीय संघातून आपला जलवा दाखवताना दिसतोय. अंडर १९ वनडे स्पर्धेतील इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने ८६ धावांच्या वादळी खेळीसह अनेक विक्रमाला गवसणी घातली. या खेळीसह त्याने २१ वर्षांपासून अबाधित असलेला सुरेश रैनाचा विक्रमही मोडित काढला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

सुरेश रैनापेक्षा भारी ठरली वैभव सूर्यंवशीची खेळी

भारतीय अंडर १९ संघाने तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंड अंडर १९ संघाला ४ विकेट्सनं पराभूत केले. इंग्लंडच्या संघाने दिलेल्या  २६९ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून सलामीवीर वैभव सूर्यंवशीने ३१ चेंडूत ९ चौकार आणि ६ चौकाराच्या मदतीने २७७.४१ च्या स्ट्राइक रेटनं ८६ धावा कुटल्या. त्याने २० चेंडूत यूथ वनडे क्रिकेटमध्ये दुसरे सर्वात जलद अर्धशतक झळकवण्यासोबतच जलदगतीने ८० पेक्षा अधिक धावा ठोकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. याआधी हा विक्रम सुरेश रैनाच्या नावे होता.

शुबमन गिल ते सचिन तेंडुलकर! SENA देशांत टेस्टमध्ये बेस्ट इनिंग खेळणारे भारतीय कॅप्टन

२१ वर्षांपासून अबाधित होता हा वर्ल्ड रेकॉर्ड 

वैभव सूर्यंवशी ८६ धावांच्या खेळीसह १९ वर्षांखालील वनडेत सर्वात जलदगतीने ८० पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने २५० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं धावा करत हा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलाय. याआधी सुरेश रैनानं २००४ मध्ये ढाकाच्या मैदानात स्टॉटलंड विरुद्धच्या सामन्यात २३६.८४ च्या स्ट्राइक रेटसह ३८ चेंडूत ९० धावांची खेळी केली होती. २१ वर्षांपासून अबाधित असलेला वर्ल्ड रेकॉर्ड वैभव सूर्यंवशीनं मोडित काढला.

१९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात सर्वात जलदगतीने ८० + धावा करणारे फलंदाज

  • वैभव सूर्यवंशी (भारत) विरुद्ध इंग्लंड - २७७.४१ च्या स्ट्राइक रेटसह ८६ चेंडूत ३१ धावा, नॉर्थहॅम्प्टन (२०२५)     
  • सुरेश रैना (भारत) विरुद्ध स्कॉटलंड- २३६.८४ च्या स्ट्राइक रेटसह ३८ चेंडूत ९० धावा, ढाका (२००४)
  • स्टीव स्लोक (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध  स्कॉटलंड- २३२.४३ च्या स्ट्राइक रेटसह ३७ चेंडूत ८६ धावा, पॉचेफ्स्ट्रूम (२०२४)    
  • फिन एलन (न्यूझीलंड) विरुद्ध केनिया- २२५ च्या स्ट्राइक रेटसह ४० चेंडूत ९० धावा, क्राइस्टचर्च (२०१६)     
  • ग्लेन फिलिप्स (न्यूझीलंड) विरुद्ध स्कॉटलंड- २२२.५ च्या स्ट्राइक रेटसह ४० चेंडूत ८९ धावा, कॉक्स बझार (२०१२) 
     

Web Title: IND U19 vs ENG U19 India U 19 Vaibhav Suryavanshi Broke 21 Year Old Suresh Raina Record vs England U19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.