Join us

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

वैभव सूर्यवंशीनं वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला मागे टाकत सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 16:49 IST

Open in App

Vaibhav Sooryavanshi New Record With Most Sixes In U19 ODI : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या भात्यातून आणखी एक विक्रमी खेळी पाहायला मिळाली. ऑस्ट्रेलिया अंडर १९ संघाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या  डावाची सुरुवात करताना वैभव सूर्यवंशीनं  ६८ चेंडूत ७० धावांची दमदार खेळी केली.  ब्रिस्बेन येथील इयान हीली ओव्हल मैदानातील या खेळीत त्याने  ५ चौकार अन् ६ उत्तुंग षटकार मारले. या कामगिरीसह त्याने माजी वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचा विक्रम मोडत नवा विक्रम सेट केला आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

वैभव सूर्यवंशीनं मोडला वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचा रेकॉर्ड; सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

 १४ वर्षीय युवा बॅटरनं भारतीय अंडर १९ संघाकडून आतापर्यंत १० वनडे सामने खेळले आहेत. यात त्याच्या भात्यातून ३९ षटकार  आले आहेत. याआधी भारतीय अंडर १९ संघाकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम हा उत्मुक्त चंदच्या नावे होते. २०१२ मध्ये त्याच्या नेतृत्वाखालील भारतीय अंडर १९ संघाने वर्ल्ड कप जिंकला होता. त्याचा विक्रम वैभव सूर्यवंशीनं मोडीत काढलाय. U19 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आता वैभव सूर्यवंशीच्या नावे झाला आहे.

अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!

युवा वनडे (U-19 ODI) मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज

खेळाडूसंघकालावधीसामनेधावासर्वोच्च धावसंख्यासरासरीशतकेअर्धशतके
वैभव सूर्यवंशीभारत२०२४-२०२५१०५४०१४३५४
उन्मुक्त चंदभारत२०११-२०१२२१११४९१२२*६७.५८
जवाद अबरारबांगलादेश२०२४-२०२५२४७६९१३०*३६.६१
शाहजैब खानपाकिस्तान२०२२-२०२४२४१०९६१५९४९.८१
तौहीद ह्रदोयबांगलादेश२०१७-२०२०४७१६२२१२३*४७.७१०
यशस्वी जायसवालभारत२०१८-२०२०४७१३८६११४*६९.३१२
अज़ीज़ुल हकीम तमीमबांगलादेश२०२४-२०२५२४८५३१०३४७.३८
अनामुल हक बिजॉयबांगलादेश२००९-२०१२३८१३२६१२८३५.८३
इसहाक मोहम्मदइंग्लंड२०२५३२७१०४४६.७१
अविष्का फर्नांडोश्रीलंका२०१४-२०१७३९१३७९१३८४०.५५
टॅग्स :वैभव सूर्यवंशीभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया