ACC Mens Asia Cup Rising Stars 2025, IND A vs PAK A : राइजिंग स्टार्स आशिया कप टी-२० स्पर्धेत रविवारी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात हायहोल्टेज सामना रंगल्याचे पाहायला मिळणार आहे. जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील भारत 'अ' संघाकडून मैदानात उतरणाऱ्या वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा असतील. नेपाळविरुद्धच्या सलामीच्या लढतीत वैभवच्या बॅटमधून विक्रमी शतकी खेळी पाहायला मिळाली होती.
भारतीय खेळाडू पाक खेळाडूंशी इथंही हात मिळवणी नाही करणार
या स्पर्धेतही बीसीसीआयच्या पाकिस्तानी खेळाडूंशी हात न मिळवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू या धोरणाचा अवलंब करत पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाहीत. आशिया कप टी-२० स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय वरिष्ठ संघानं पाक विरुद्ध खेळणार पण खेळाडूंसोबत हस्तांदोलन नाही करणार अशी भूमिका घेतली होती. महिला वर्ल्ड कप स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने ही भूमिका कायम ठेवली. आता जितेश शर्माच्या नेतृत्वाखाली देखील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात तेच चित्र पाहायला मिळणार आहे.
वैभव सूर्यवंशीवर असतील सर्वांच्या नजरा
१४ वर्षीय सूर्यवंशीने आयपीएलमध्ये शतकी खेळीसह आपल्यातील धमक दाखवून दिली. त्यानंतर आता तो भारतीय अ संघाकडून आपली खास छाप सोडताना दिसत आहे. यूएईविरुद्ध त्याने फक्त ४२ चेंडूत १५ षटकारांच्या मदतीने १४४ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. भारतीय 'अ' संघाकडून क्रिकेटमध्ये शतक झळकवणारा सर्वात कमी वयाचा भारतीय खेळाडू ठरला आहे. पाकिस्तान विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून अशाच दिमाखदार कामगिरीची अपेक्षा असेल.
Web Summary : India A will maintain BCCI's policy, avoiding handshakes with Pakistani players during the Rising Stars Asia Cup match. Focus is on Vaibhav Suryavanshi after his record-breaking century. He is the youngest Indian to score a century for India A.
Web Summary : राइजिंग स्टार्स एशिया कप में भारत ए, बीसीसीआई की नीति का पालन करते हुए पाकिस्तानी खिलाड़ियों से हाथ नहीं मिलाएगा। वैभव सूर्यवंशी पर सबकी निगाहें हैं, जिन्होंने रिकॉर्ड तोड़ शतक बनाया। वह भारत ए के लिए शतक बनाने वाले सबसे कम उम्र के भारतीय हैं।