Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs PAK : कोलंबो आधी बँकाँकच्या मैदानात भारताच्या रणरागिणींनी केला पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम'

भारतीय महिला अ संघाने ८ विजय राखून दणदणीत विजय नोंदवत या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 15:15 IST

Open in App

IND A vs PAK A Women's Rising Stars Asia Cup 2026 : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणाऱ्या भारत-पाक यांच्यातील हाय व्होल्टेज लढती आधी राधा यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय रणरागिणींनी बँकाँकच्या मैदानात पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम केला आहे.  महिला राइजिंग स्टार्स आशिया कप २०२६ स्पर्धेतील सामन्यात पाकिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार राधा यादव आणि प्रेमा रावतशिवाय सायमानं प्रत्येकी २-२ विकेट्स घेत पाकिस्तानी महिला 'अ' संघाचा डाव अवघ्या ९३ धावांत आटोपला होता. या  धावसंख्येचा पाठलाग करताना वृंदा दिनेश हिच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारतीय महिला 'अ' संघाने ८ विजय राखून दणदणीत विजय नोंदवत या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अनुष्का शर्मानं वृंदाला दिली उत्तम साथ अन्...

पाकिस्तानच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना वृंदा दिनेश आणि  हुमैरा काझी या जोडीनं भारतीय महिला 'अ' संघाच्या डावाची सुरुवात केली. हुमैरा खातेही न उघडता तंबूत परतल्यावर अनुष्का शर्माने आपल्या बॅटिंमधील धमक दाखली. तिने ४ चौकाराच्या मदतीने २६ चेंडूत २४ धावा करत वृंदाला उत्तम साथ दिली. ती बाद झाल्यावर तेजल हसबनीसच्या १२ (५) साथीनं वृंदानं ११ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मॅच संपवली.  फक्त २९ चेंडूत १२ चौकाराच्या मदतीने ५५ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

कोलंबोत आज पाऊस पडला तर काय? सामना राखीव दिवशी होणार की..,ICCचा तो नियम वाचून तुम्हाला बसेल धक्का

गत चॅम्पिन भारतीय संघाचे दमदार कमबॅक  

या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय 'अ' संघाला युएई महिला संघाने पराभवाचा धक्का दिला होता. त्यामुळे भारतीय संघासाठी पाकिस्तानविरुद्धची 'लढत करो वा मरो'ची होती. या सामन्यातील विजयासह २ गुणांची कमाई करत भारतीय संघ गुणतालिकेत उत्तम धावगतीसह दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. भारतीय संघ गत चॅम्पियन असून पाकिस्तानविरुद्धच्या लढतीनंतर संघाने पुन्हा एकदा या स्पर्धेत धमक दाखवण्यासाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India Women A team crushes Pakistan A in Rising Stars Cup.

Web Summary : India Women A defeated Pakistan A in the Rising Stars Asia Cup. Radha Yadav's team bowled out Pakistan for 93. Vrusha Dinesh's unbeaten fifty secured an 8-wicket victory for India.
टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानएशिया कपमहिला टी-२० क्रिकेट