Join us

IND vs PAK : MS Dhoniच्या पठ्ठ्याने पाकिस्तानला धडा शिकवला; भारताने निम्मा संघ तंबूत पाठवला

भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात कोलंबो येथे लढत सुरू आहे. पाकिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 15:52 IST

Open in App

IND A vs PAK A ACC Men's Emerging Cup : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या आशिया चषक स्पर्धेतील तारखेची चाहते आतुरतेने वाट पाहत असताना आज इमर्जिंग चषक स्पर्धेत दोन्ही संघ भिडले आहेत. भारत अ आणि पाकिस्तान अ यांच्यात कोलंबो येथे लढत सुरू आहे. पाकिस्तान अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या युवा गोलंदाज राजवर्धन हंगर्गेकरने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. चौथ्या षटकात राजवर्धनने पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना भोपळ्यावर माघारी पाठवले. 

भारतीय संघाने सलग दोन विजय मिळवून आधीच उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. आज पाकिस्तानविरुद्ध विजयी लय कायम राखण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न आहे. सईम आयूब आणि साहिबजादा फरहान यांनी पाकिस्तानच्या डावाची सुरूवात केली. राजवर्धनने चौथ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर आयूबला ( ०) यष्टिरक्षक ध्रुव जुरेलच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ओमेर युसूफ ( ०) यालाही जुरेलकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. पाकिस्तानची अवस्था २ बाद ९ अशी केली होती.

फरहान व हसीबुल्लाह खान यांनी पाकिस्तानचा डाव सावरला, परंतु रियान परागने महत्त्वाची विकेट घेतली. फरहान ( ३५) धावांवर झेलबाद झाला. मानव सुतारने त्याच्या तिसऱ्या षटकात कामरान घुलाम ( १५) ची आणि खान ( २७) यांची विकेट मिळवली आणि पाकिस्तानची अवस्था ५ बाद ७८ अशी केली. 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ
Open in App