दुग्धशर्करा योग! IPLचा १००० सामना अन् रोहितचा बर्थ डे; MI विजयी भेट देण्यासाठी सज्ज, जोफ्राची झाली एन्ट्री

ipl 2023, MI vs RR : आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 19:07 IST2023-04-30T19:07:48+5:302023-04-30T19:07:58+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
In the 1000th match of IPL, Rajasthan Royals have won the toss and they've decided to bat first | दुग्धशर्करा योग! IPLचा १००० सामना अन् रोहितचा बर्थ डे; MI विजयी भेट देण्यासाठी सज्ज, जोफ्राची झाली एन्ट्री

दुग्धशर्करा योग! IPLचा १००० सामना अन् रोहितचा बर्थ डे; MI विजयी भेट देण्यासाठी सज्ज, जोफ्राची झाली एन्ट्री

MI vs RR Live Match । मुंबई: आयपीएलच्या इतिहासातील १०००वा सामना आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जात आहे. सध्या आयपीएलच्या (IPL 2023) सोळाव्या हंगामाचा थरार रंगला असून या हंगामाचा निम्मा टप्पा पार पडला आहे. जवळपास सर्वच संघांनी आठ ते नऊ सामने खेळले असून गुणतालिकेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे. आताच्या घडीला १२ गुणांसह गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ अव्वल स्थानावर आहे. तर स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ अर्थात मुंबई इंडियन्स यंदा संघर्ष करत आहे. संघाची खराब गोलंदाजी पराभवाचे प्रमुख कारण ठरते आहे. 

आजच्या सामन्यासाठी राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुंबईच्या संघात मोठा बदल करण्यात आला असून अर्जुन तेंडुलकर बाकावर असणार आहे. याशिवाय वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचे पुनरागमन झाले आहे.

आज RR vs MI वानखेडेवर थरार 
आज मुंबई इंडियन्स आपल्या आठव्या सामन्यात राजस्थान रॉयल्ससोबत भिडत आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात मुंबईचा संघ आपल्या कर्णधाराला वाढदिवसादिवशी विजयी भेट देणार का हे पाहण्याजोगे असेल. आज मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा ३६ वाढदिवस असून हिटमॅनने आपला वाढदिवस मुंबई इंडियन्सच्या शिलेदारांसोबत साजरा केला. रोहितच्या वाढदिवशीच मुंबईचा संघ आयपीएलच्या इतिहासातील १००० वा सामना खेळत आहे.

रोहितच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: In the 1000th match of IPL, Rajasthan Royals have won the toss and they've decided to bat first