Join us

... त्याने झेल पकडला, चाहत्यांना डिवचलं अन् त्याचा पोपट झाला

त्या खेळाडूने झेल टिपला, चाहत्यांना डिवचलं, पण त्यानंतर मात्र त्याचा पोपट झाल्याचेच पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 18:38 IST

Open in App
ठळक मुद्देदक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी एक सराव सामना सुरु असताना ही गोष्ट घडली.

नवी दिल्ली :  काही वेळा खेळाडूंना चाहते त्रास देत असतात. पण त्या खेळाडूने एखादी चांगली कामगिरी केली तर तो चाहत्यांना डिवचतो. असंच एका सामन्यात झालं. त्या खेळाडूने झेल टिपला, चाहत्यांना डिवचलं, पण त्यानंतर मात्र त्याचा पोपट झाल्याचेच पाहायला मिळाले.

ही गोष्ट आहे ऑस्ट्रेलियातली. दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी एक सराव सामना सुरु असताना ही गोष्ट घडली.

हा पाहा व्हिडीओ

दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू इम्रान ताहिर सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी त्याला चाहत्यांनी काही टोमणे मारले. हे टोमणे त्याच्या क्षेत्ररक्षणाबद्दल होते. पण काही वेळातच ताहिरने एक झेल पकडला. हा झेल पकडल्यावर त्याने चेंडू हातात धरून आपल्या जर्सीचा क्रमांक चाहत्यांना दाखवून डिवचण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर हा नोबॉल असल्याचे त्याला समजले आणि त्याचा पोपट झाला.

टॅग्स :द. आफ्रिकाआॅस्ट्रेलिया