Join us

इम्रान खान यांना मिळाली होती बॉलीवूडमध्ये काम करण्याची ऑफर, पण झालं तरी काय...

त्यांनी याबद्दल या वायरल  झालेल्या व्हिडीओमध्ये पूर्ण गोष्ट सांगितली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 17:17 IST

Open in App

 मुंबई : सध्याच्या घडीला पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांचा एक व्हिडीओ चांगलाच वायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आपल्याला बॉलीवूडची ऑफर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

इम्रान यांचा बॉलीवूडमध्ये चांगलाच दबदबा होता. एका अभिनेत्रीबरोबर त्यांचे अफेअरही होते. त्यामुळे त्यांना बॉलीवूड काही नवीन नव्हते. एका दिग्गजाने त्यांना ऑफरही दिली होती. पण त्यांनी याबद्दल या वायरल  झालेल्या व्हिडीओमध्ये पूर्ण गोष्ट सांगितली आहे.

एका दिग्गज फिल्ममेकरने इम्रान यांना आपल्या सिनेमात काम करण्याची ऑफर दिली होती. या दिग्गज व्यक्तीचे आपण नाव सांगणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. जेव्हा इम्रान लंडनमध्ये होते तेव्हा या दिग्गज व्यक्तीने इम्रान यांनी ही ऑपर दिली होती.

या ऑफरबद्दल इम्रान म्हणाले की, " मी इंग्लंडमध्ये असताना बॉलीवूडमधील एका दिग्गजाने मला सिनेमामध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. त्यावेळी मी चांगल्या फॉर्मात होतो. त्यामुळे कदाचित त्यांनी मला ही ऑफर दिली असेल." 

इम्रान पुढे म्हणाले की, " जेव्ही त्यांनी मला याबद्दल सांगितले तेव्हा मला मोठा धक्काच बसला. मी चांगले क्रिकेट खेळतो याचा अर्थ मी अभिनयही उत्तम करू शकेन, असा होत नाही. मला इस्माइल मर्चंट यांनीसुद्ध सिनेमामध्ये काम करण्याबाबत विचारणा केली होती. मी यापूर्वीच कधीच अभिनय केला नव्हता. त्यामुळे आता मी करू शकत नाही, असे मी ठरवले आणि त्यांनी नाही म्हणून सांगितले."

इम्रान यांना सिनेमाची ऑफर देणारे दिग्गज फिल्ममेकर कोण, याचा विचार तुम्ही करत असाल, तर दे होते एव्हरन्रीन देव आनंद. आपल्या बायोग्राफीमध्ये  त्यांनी या गोष्टी उल्लेखही केला आहे.

टॅग्स :इम्रान खानदेव आनंदपाकिस्तान