संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय लीग टी-२० स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा MI एमिरेट्स विरुद्ध डेजर्ट वायपर्स यांच्यात जेतेपदाची लढत रंगली होती. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात डेजर्ट वायपर्सनं पोलार्डच्या MI एमिरेट्सला पराभूत करत यंदाच्या हंगामातील जेतेपदावर नाव कोरले. अंतिम सामन्यात कॅरेबियन स्टार किरॉन पोलार्ड आणि पाकिस्तानचा नसीम शाह यांच्यातील वादाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. ILT20 च्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन दोघांच्यातील शाब्दिक वादावादीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून तो तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
फायनल मॅचदरम्यान मैदानात नेमकं कधी आणि काय घडलं?
एमआय एमिरेट्सच्या डावातील ११ व्या षटकात नसीम शाह गोलंदाजी करत होता. षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याने गुड लेंथवर मारा केला. पोलार्डने हा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू थेट बॅटला लागून पॅडवर आदळला. त्यानंतर नसीम शाह याने पोलार्डकडे रोखून पाहू लागला. यावर पोलार्डही नसीमजवळ गेला आणि दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. मैदानातील पंचांनी मध्यस्थी करत वाद मिटवल्याचे पाहायला मिळाले.
IND vs NZ ODI: भारताचा संघ जाहीर; अय्यर IN; ऋतुराज, तिलक OUT, बुमराह-पांड्याला विश्रांती
फायनलमध्ये नसीम शाह आणि पोलार्डची कामगिरी
करॉन पोलार्ड याने या सामन्यात २८ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने २८ धावा केल्या आणि तो बाद झाला. दुसरीकडे, नसीम शाहने अंतिम सामन्यात शानदार गोलंदाजी करत ३ बळी टिपले. त्याने पोलार्डसह आंद्रे फ्लेचर आणि टॉम बँटन यांना बाद केले. नसीमने ४ षटकांत केवळ १८ धावा देत ३ महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. घेत किफायतशीर गोलंदाजी केली. डेजर्ट वायपर्सच्या जेतेपदात त्याचा मोलाचा वाटा ठरला.
जेतेपद जिंकल्यावर नसीम शाहची प्रतिक्रिया
सामना जिंकल्यानंतर नसीम शाह म्हणाला की, "फायनल सामना नेहमीच वेगळ्या दबावाचा असतो. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर संपूर्ण संघाने योगदान दिलं. आमच्याकडे प्रत्येक विभागासाठी चांगले पर्याय होते आणि मॅनेजमेंटने त्यांचा योग्य वापर केला. सर्व खेळाडूंनी १०० टक्के मेहनत घेतली आणि त्याचा परिणाम सर्वांसमोर आहे."