मुंबई : हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांची कारकिर्द अडचणीत सापडणार, असे सध्याच्या घडीला दिसत आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकात हे दोघे खेळणार की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. पण जर पंड्या संघात नसेल, तर एक अष्टपैलू खेळाडू संघासाठी हुकमी एक्का ठरी शकतो, असे भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने म्हटले आहे.
बीसीसीआयने हार्दिक आणि राहुल यांच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत एका आठवड्यानंतर निर्णय घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे हार्दिक आणि राहुल यांच्या भविष्याबाबत बऱ्याच जणांना चिंता वाटत आहे.
याविषयी गंभीर म्हणाला की, " राहुल संघात नसेल तर त्याचा जास्त परीणाम संघावर होणार नाही. कारण त्याची जागा अंबाती रायुडू घेऊ शकतो. पण हार्दिक हा संघासाठी उपयुक्त ठरू शकतो. पण जर हार्दिक विश्वचषकामध्ये खेळू शकला नाही, तर त्याची जागा रवींद्र जडेजा घेऊ शकतो."