नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) मुख्य कार्यकारी समितीची (सीईसी) गुरुवारी कॉन्फरन्स कॉलच्या माध्यमातून बैठक होणार आहे. त्यात कोविड-१९ मुळे होणाऱ्या आर्थिक परिणामाव्यतिरिक्त विश्व कसोटी चॅम्पियनशिप व वन-डे लीग कार्यक्रमावर चर्चा होणार आहे.
वन-डे लीगला जूनमध्ये सुरुवात होणार होती. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यादरम्यान तीन सामन्यांची मालिका या लीगची पहिली सीरिज राहील, पण या महामारीमुळे सोमवारी ही मालिका रद्द करण्यात आली आहे. जोपर्यंत कुठला ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आयसीसीला या महामारीमुळे किती स्पर्धा रद्द कराव्या लागतील, याची कल्पना येणार नाही.