VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?

1998 नंतर दक्षीण आफ्रिकेने पहिल्यांदाच आयसीसी खिताब जिंकला. हा त्याचा दुसरा आयसीसी खिताब आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:57 IST2025-06-16T13:55:48+5:302025-06-16T13:57:15+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
icc wtc final 2025 South African cricketer dale steyn crying when south africa won | VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?

VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?

दक्षिण आफ्रिका संघाचा माजी दिग्गद गोलंदाज डेल स्टेन, हा आपल्या काळातील जगातील काही अत्यंत घातक गोलंदाजांपैकी एक होता. त्याने आपल्या दक्षीण आफ्रिका संघाला अनेक सामने जिंकून दिले. मात्र, त्याचा संघ तो असताना एकही आसीसी ट्रॉफी जिंकू शकला नाही. आता तेम्बा बावुमाच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा खिताब जिंकला आहे. यामुळे तो भावूक झाला. तो लाईव होता. यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रू आले...

तेम्बा बावुमाने टॉस जिंकून सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 212 धाना केल्या होत्या. मात्र, आफ्रिका संघ 138 धावांवरच तंबूत परतला. मत्र, दुसऱ्या डावात संघाने शानदार पुणरागमन केले. दक्षिम आप्रिकेला विजयासाठी 282 हव्या होत्या. हे लक्ष्य संघाने 5 गडी राखून गाठले. या विजयानंतर, दक्षीण आफ्रिकेचे खेळाडूनही आनंदात दिसले.

डेल स्टेनला रडू कोसळलं - 
स्टार स्पोर्ट्सवर विजयासंदर्भात प्रतिक्रिया देताना डेल स्टेन म्हणाला, "आपण आता काय सांगू शकता, एवढेच म्हणेल की हे अद्भुत आहे. मी माझ्या घरात बसलेलो  आहे, माझ्या जवळ माझ्या संघाची कॅप आहे. मी आता माझ्या मुलाला वॉकिंगसाठी नेणार आहे. जिवण पुन्हा तसेच दौडू लागेल." स्टेन एवढे बोलला आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू आले. यानंतर त्याने कॅमेऱ्यावर केवळ थम्स अप केला आणि तो रडू लागला. त्याने पेपर उचलला आणि अश्रू पुसू लागला. त्याला काही बोलणेही कठीण जात होता. यावेळी त्याचे डोळे पाणावलेले होते.

27 वर्षांनंतर ICC ट्रॉफी विजय - 
1998 नंतर दक्षीण आफ्रिकेने पहिल्यांदाच आयसीसी खिताब जिंकला. हा त्याचा दुसरा आयसीसी खिताब आहे.

Web Title: icc wtc final 2025 South African cricketer dale steyn crying when south africa won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.