Join us

India vs Pakistan यांच्यात कसोटी वर्ल्ड कप फायनल शक्य; इंग्लंड, ऑस्ट्रेलियावरील कारवाईने शुभ संकेत 

ICC World Test Championship Points Table - भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन पर्वात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 17:48 IST

Open in App

ICC World Test Championship Points Table - भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन पर्वात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२१मध्ये न्यूझीलंडकडून, तर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून टीम इंडियाची हार झाली. पण, दोन्ही पर्वात फायनलमध्ये पोहोचवणारी टीम इंडिया WTC 25च्या तिसऱ्या पर्वातही दमदार कूच करताना दिसतेय. दुसरीकडे पाकिस्ताननेही WTC 25मधील त्यांच्या पहिल्याच कसोटीत क्लीनशीट राखून अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे India vs Pakistan अशी ड्रिम फायनल २०२५ मध्ये पाहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. क्रिकेटची पंढरी अर्थात लॉर्ड्सवर ही ऐतिहासिक फायनल होईल.

अॅशेस मालिकेनंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत फेरबदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. ५ सामन्यांची ती मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. त्यात आज आयसीसीनं दोन्ही संघांवर कारवाई केली. षटकांची वेळ न पाळल्यामुळे त्यांचे गुण वजा करण्यात आले. इंग्लंडला १९ व ऑस्ट्रेलियाला १० गुणांची  पेनल्टी बसली आहे. त्यामुळे आशियाई शेजारी भारत व पाकिस्तान यांची अव्वल दोन स्थानांवरील पकड अधिक मजबूत झाली आहे. हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित राहिले आहेत.  

पाकिस्तानने २०२३-२५च्या सर्कलमध्ये श्रीलंकेविरुद्ध २-० असा कसोटी मालिका विजय मिळवून १०० टक्के गुणांची कमाई केली आहे. बाबर आजमच्या नेतृत्वाखालील संघाने यजमान श्रीलंकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले.  दुसरीकडे भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका १-० अशी जिंकली. दुसरा सामना पावसामुळे रद्द करावा लागल्याने भारताचा निकाल १०० टक्के लागला नाही आणि त्यांना ६६.६६ टक्क्यांवर समाधान मानावे लागले. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यावर कारवाई होण्याआधी दोघांची टक्केवारी ही ४३.३३ इतकी होती. पण, आता ऑस्ट्रेलियाचे ३० टक्के आणि इंग्लंडचे १५ टक्के झाले आहेत. वेस्ट इंडिज १६.६७ टक्क्यांसह इंग्लंडच्या पुढे गेली आहे.

भारतीय संघाचं पुढील कसोटी वेळापत्रक

 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध पाकिस्तानअ‍ॅशेस 2019
Open in App