ICC टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी U19 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने यंदाच्या U19 वर्ल्ड कप स्पर्धेत धमाकेदार कामगिरीसह सहाव्यांदा ही स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने आगेकूच केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी-२० आधी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत रंगणार भारत-पाक यांच्यातील सामना
ICC च्या U19 वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीत न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दिमाखदार विजय नोंदवत भारतीय युवा संघाने सलग तिसऱ्या विजयासह 'ब' गटात अव्वलस्थान पटकावत सुपर सिक्समधील प्रवेश निश्चित केला. दुसऱ्या बाजूला 'अ' गटातून पाकिस्तानच्या संघानेही सुपर सिक्समध्ये एन्ट्री मारली आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सूर्यादादा आणि सलमान आगा यांच्यातील लढतीआधी वैभव सूर्यवंशी पाकिस्तानला नडणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. इथं एक नजर टाकुयात U19 वर्ल्ड कप स्पर्धेत कधी रंगणार भारत-पाक यांच्यातील हायहोल्टेज सामना यासंदर्भातील सविस्तर....
T20 World Cup 2026 : बांगलादेशला हरभऱ्याच्या झाडावर चढवून खाली पाडलं; नौटंकीनंतर पाक संघाची घोषणा
कधी अन् कुठ रंगणार हा सामना?
सुपर सिक्समध्ये भारतीय संघ झिम्बाब्वे विरुद्ध पहिला सामना खेळेल. हा सामना २७ जानेवारी, २०२६ रोजी खेळवला जाईल. १ फेब्रुवारी, २०२६ रोजी भारत-पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना पाहायला मिळाले. ही लढत बुलवायो येथील क्विन्स पार्क स्पोर्ट्स क्बबच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. दोन्ही सामने दुपारी १ वाजता सुरु होतील. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील संघ दोन्ही सामन्यात आपला दबबाद कायम ठेवत सहाव्यांदा ट्रॉफी उंचावण्याच्या दिशेनं आपला प्रवास कायम ठेवेल, अशी अपेक्षा आहे.
U19 वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाची कामगिरी
अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेला एकतर्फी मात देत यंदाच्या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात एकदम धमाक्यात केली होती. दुसऱ्या सामन्यात युवा टीम इंडियाने बांगलादेशला दणका दिला. न्यूझीलंडवर एकतर्फी मात देत भारतीय संघाने साखळी फेरीत अपराजित राहून सुपर सिक्समध्ये प्रवेश केला आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी प्रत्येकी १-१ अर्धशतक झळकावले आहे. झिम्बाव्वेसह पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत वैभव सूर्यवंशी शतकी धमाका करणार का? याकडेही सर्वांच्या नजरा असतील.