Join us
Daily Top 2Weekly Top 5

ODI WC 2023 : "बसून फक्त खात राहतोस, जाऊन सिक्स मार की...", चाहत्याची कमेंट अन् 'सूर्या' संतापला

भारतात सध्या वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 16:46 IST

Open in App

icc world cup 2023 : भारतात सध्या वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. यजमान भारतीय संघाने विजयी हॅटट्रिक लगावून गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव विश्वचषकाच्या संघाचा भाग असला तरी 'सूर्या'चा सुपर शो चाहत्यांना पाहायला मिळाला नाही. खरं तर सूर्यकुमारला एकाही सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. पण, डगआउटमध्ये बसलेल्या 'सूर्या'चा एक व्हिडीओ त्याला प्रसिद्धी देऊन गेला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यादरम्यानचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चेन्नई येथे झालेल्या सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव करून विजयी सलामी दिली. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसते की, सूर्यकुमार यादव काहीतरी खात असतो अन् कॅमेऱ्याची एन्ट्री होताच तो स्तब्ध होतो.

भारतीय खेळाडूच्या व्हायरल व्हिडीओवर एका चाहत्याने लिहले, "सर डगआउटमध्ये बसून काय खात असता? मैदानात जाऊन दोन-चार षटकार मारून या". चाहत्याच्या या भन्नाट प्रश्नावर 'सूर्या' संतापला. चाहत्याच्या पोस्टवर व्यक्त होताना त्याने म्हटले, "ऑर्डर मला नाही स्विगीवर दे भाई." 

भारतीय संघाने आतापर्यंतचे आपले तिन्ही सामने जिंकून विजयाची हॅटट्रिक लगावली. तीन विजयांसह टीम इंडिया क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांचा दारूण पराभव केला. मोठ्या विजयांमुळे रोहितसेना रनरेटच्या बाबतीत देखील सुसाट आहे. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपसूर्यकुमार अशोक यादवऑफ द फिल्ड