Join us

ICC World Cup 2019 : ख्रिस गेलचा वर्ल्ड कपमधील अखेरचा सामना, ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची संधी

ICC World Cup 2019: वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरचा सामना आज खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 14:56 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरचा सामना आज खेळणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या या सामन्यात गेलला दिग्गज फलंदाज ब्रायन लाराचा विक्रम मोडण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला केवळ 18 धावांचा पल्ला ओलांडावा लागणार आहे.  

वेस्ट इंडिजकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम लाराच्या नावावर आहे. लाराने 295 सामन्यांत 10348 धावा केल्या आहेत, तर गेलच्या नावावर 294 सामन्यांत 10331 धावा आहेत. त्यामुळे लाराचा हा विक्रम मोडण्यासाठी गेलला 18 धावांची गरज आहे.   

विंडीजकडून सर्वाधिक धावा करणारे फलंदाजब्रायन लारा - 295 सामने 10348 धावाख्रिस गेल - 294 सामने 10331 धावाशिवनारायण चंद्रपॉल - 268 सामने 8778 धावाडेसमंड हेंस - 238 सामने 8648 धावाव्हिव्हियन रिचर्ड्स - 187 सामने 6721 धावा

वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात यशस्वी फलंदाज बनण्याची संधीआजच्या सामन्यात गेलने 47 धावा केल्यास वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा विंडीज फलंदाजाचा विक्रम त्याच्या नावावर होईल. लाराने 1225 धावा केल्या आहेत. शिवाय त्याने शतक केल्यास वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतक मारणाऱ्या व्हिव्हियन रिचर्ड्स ( 3) यांच्या विक्रमाशी तो बरोबरी करणार आहे. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019ख्रिस गेलवेस्ट इंडिजअफगाणिस्तान