- ललित झांबरे
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील श्रीलंका आणि अफगणिस्तानदरम्यानचा मंगळवारचा सामना तसा रुटीनच ठरला. या सामन्यात पावसाचा व्यत्यय आणि मोहम्मद नबीचे एकाच षटकात तीन बळी वगळता विशेष काहीच घडले नाही. मात्र तरीही या सामन्यत श्रीलंकेसाठी एक असा विक्रम घडला जो कोणत्याही संघाला नकोसा असेल.
या सामन्यात श्रीलंकेचे चार, पाच, सहा आणि सातव्या क्रमांकाचे फलंदाज अनुक्रमे 2, 0, 0, 2 धावा काढून बाद झाले. म्हणजे मधल्या फळीचे योगदान फक्त चार धावांचे राहिले आणि लागोपाठ दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेची मधली फळी अशी ढेपाळली. गेल्या सामन्यातही न्यूझीलंडविरुध्द त्यांचे चार ते सात क्रमांकाचे फलंदाज अनुक्रमे 0, 4, 0, 1 धावा काढून बाद झाले होते.
वन डे क्रिकेटच्या इतिहासातील हजारो सामन्यांपैकी केवळ सात सामने असे आहेत ज्यात मधल्या फळीच्या फलंदाजांनी पाचपेक्षाही कमी धावांचे योगदान दिले आहे. त्यापैकी दोन डाव श्रीलंकेचे आहेत.
मधल्या फळीची घसरगुंडी उडालेले हे सात डाव पुढीलप्रमाणे (एकूण 5 पेक्षा कमी धावा- चार ते सात क्रमांकाच्या फलंदाजांच्या धावा क्रमाने)
1)
श्रीलंका वि. अफगणिस्तान, कार्डिफ, 2019- 2 | 0 | 0 | 2
2) श्रीलंका वि. न्यूझीलंड, कार्डिफ, 2019- 0 | 4 | 0 | 1
3) न्यूझीलंड वि. अॉस्ट्रेलिया, ब्रिस्बेन, 2009- 4 | 0 | 0 | 1
4) बांगलादेश वि. इंग्लंड, चितगांव, 2003- 2 | 0 | 0 | 0
5) नेदरलँड वि. भारत, पार्ल, 2003- 0| 0 | 1 | 1
6) ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, सिडनी, 1983- 0 | 0 | 1 | 1
7) न्यूझीलंड वि. इंग्लंड, मँचेस्टर, 1978 0| 0 | 2 | 1