Join us

ICC World Cup 2019 : विराट कोहलीची 'ती' कृती ठरली Social Hit; रचला नवीन विक्रम, पाहा व्हिडीओ

आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) बुधवारी वर्ल्ड कप स्पर्धेच्या डिजिटल प्रेक्षकांचा आकडेवारा जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 12:55 IST

Open in App

दुबई, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) बुधवारी वर्ल्ड कप स्पर्धेच्या डिजिटल प्रेक्षकांचा आकडेवारा जाहीर केली. इंग्लंड आणि वेस्ल येथे पार पडलेली ही स्पर्धा जगातील सर्वाधिक चाहत्यांनी पाहीलेली स्पर्धा ठरली आहे. सामना असताना आणि नसताना अशा दिवशी मिळालेल्या चाहतावर्गाने सर्व विक्रम मोडले आहेत. आयसीसीच्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावर एकूण 3.6 बिलियन व्ह्यू मिळाले आहेत. यापैकी 1 बिलियन व्ह्यू हे आयसीसीच्या ऑफिशियल डिजिटल क्लीपवरून मिळाले आहेत.

त्याशिवाय ट्विटर आणि इंस्टाग्रामवरही 3 मिलियन लोकांनी व्हिडीओ पाहिले आहेत. आयसीसीच्या YouTube चॅनेलवरील प्रेक्षकांची संख्या ही 2.3 बिलियन आहे. फेसबुकवर 1.2 बिलियन मिनिट्स वर्ल्ड कपचा कंटेट पाहिला गेला. त्यात 10 बिलियन लोकांनी लाईस्क दिले, तर 68 मिलियन एंगेजमेंट होती. पण, या संपूर्ण डिजिटल आकडेवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हिट ठरला. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात त्यानं दाखवलेली खिलाडूवृत्ती सोशल व्हायरल ठरली. आयसीसीनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडीओ ठरला.  भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाचे पाठीराखे ऑसीच्या स्टीव्ह स्मिथला डिवचत होते. त्यामुळे नाराज झालेल्या कोहलीनं प्रेक्षकांचे कान टोचले होते.

पाहा व्हिडीओ... 20 मे ते 15 जुलै या कालावधीत 31 मिलियन ट्विट्स जनरेट झाले. 2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तुलनेत ही आकडेवारी 100 टक्क्याहून अधिक आहे.भारत-पाक सामन्याची चलतीभारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्याला सर्वाधिक पसंती मिळाली. या एका सामन्यात 2.9 मिलियन ट्विट्स फिरले. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना आणि भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामना यांना पसंती मिळाली. 

 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019विराट कोहलीस्टीव्हन स्मिथभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआयसीसी