ICC World Cup 2019 : आयसीसीच्या विश्वचषकाच्या संघात विराट कोहलीला स्थान नाही

आयसीसीने जाहीर केलेल्या संघात फक्त दोन भारतीय खेळाडूंचा सामावेश करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 17:19 IST2019-07-15T17:18:40+5:302019-07-15T17:19:55+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ICC World Cup 2019: Virat Kohli has no place in the ICC World Cup squad | ICC World Cup 2019 : आयसीसीच्या विश्वचषकाच्या संघात विराट कोहलीला स्थान नाही

ICC World Cup 2019 : आयसीसीच्या विश्वचषकाच्या संघात विराट कोहलीला स्थान नाही

लंडन, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : विश्वचषकाची अंतिम फेरी झाल्यानंतर आयसीसी या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूंचा एक संघ बनवते. यावेळीही आयसीसीने विश्वचषकातील सर्वोत्तम संघ जाहीर केला आहे. पण या संघात सध्याच्या घडीला यशोशिखरावर समजल्या जाणाऱ्या भारताच्या विराट कोहलीचे नाव नसल्याचे पुढे आले आहे.

आयसीसीने जाहीर केलेल्या संघात फक्त दोन भारतीय खेळाडूंचा सामावेश करण्यात आला आहे. या संघात भारताच्या रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांना स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या खेळाडूंची संख्या या संघात जास्त आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन, लुकी फर्ग्युसन यांचा समावेश करण्यात आला आहे, तर ट्रेंट बोल्टला बारावा खेळाडू ठेवला आहे.

आयसीसीच्या संघात इंग्लंडच्या जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि अॅलेक्स कॅरी यांना संघात स्थान दिले आहे. या विश्वचषकात दमदार अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या बांगलादेशच्या शकिब अल हसन याचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.


 



 

Web Title: ICC World Cup 2019: Virat Kohli has no place in the ICC World Cup squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.