Join us

ICC World Cup 2019 : भारत-इंग्लंड सामन्यात जिंकणार कोण? जगातील वेगवान धावपटू उसेन बोल्टची भविष्यवाणी

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारत आणि इंग्लंड हे दोन संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 13:30 IST

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारत आणि इंग्लंड हे दोन संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होते. मात्र, एका अनपेक्षित निकालाने यजमान इंग्लंड या शर्यतीत पिछाडीवर पडताना दिसत आहे. भारतीय संघ पाच सामन्यांत चार विजय व एक अनिर्णीत निकालासह स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे, तर इंग्लंडला सहा सामन्यांत दोन धक्कादायक ( पाकिस्तान व श्रीलंका) पराभव पत्करावे लागले आहेत. अशात त्यांचे उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या अपेक्षानांही सुरूंग लागू शकतो. इंग्लंडला आज ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे, तर उर्वरित दोन लढतीत भारत व न्यूझीलंडचे खडतर आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

आजच्या इंग्लंड-ऑस्ट्रेलिया लढतीप्रमाणे चाहत्यांना रविवारी होणाऱ्या इंग्लंड-भारत या सामन्याची उत्सुकता आहे. ही लढत म्हणजे अंतिम सामन्याची रंगीत तालिम असेल, असे जाणकारांचे मत आहे. त्यात इंग्लंड करो या मरो परिस्थितीत असल्यानं त्यांच्याकडून सर्वोत्तम खेळाची अपेक्षा आहे. तरीही या सामन्यात भारताचे पारडे जड असल्याची चर्चा आहे. या चर्चेत जगातील वेगवाग धावपटू उसेन बोल्टनंही उडी घेतली आहे. जमैकाच्या या धावपटूच्या नावावर आठ ऑलिम्पिक सुवर्णपदकं आहेत. 2016च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेनंतर त्यानं निवृत्ती स्वीकारली. 100, 200 आणि 4 बाय 100 रिले शर्यतीतील विश्वविक्रम बोल्टच्या नावावर आहेत. सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये 100 व 200 मीटर स्पर्धा जिंकण्याचा ( हॅटट्रिक) विक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू आहे. 

त्यानेही भारत-इंग्लंड या सामन्या बाजी कोण मारेल, याची भविष्यवाणी केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या #OneDay4Children या मोहिमेंतर्गत बोल्टशी लहान मुलांनी संवाद साधला आणि त्यात त्याला हा प्रश्न विचारण्यात आला. तो म्हणाला,''क्रिकेटमध्ये मला चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला नेहमी आवडते. खास करून ख्रिस गेलच्या फलंदाजीचा आनंद लुटायला आवडते. इंग्लंडच्या संघाला एक सल्ला देऊ इच्छितो, त्यांनी सर्वोत्तम खेळ करावा. भारत-इंग्लंड सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघच बाजी मारेल.'' 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019भारतइंग्लंड