मुंबई - डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आवड्यासांठी संघाबाहेर झाल्याने भारतीय संघाच्या विश्वचषक स्पर्धेतील मोहिमेला जबरदस्त धक्का बसला आहे. धवनच्या अनुपस्थितीमध्ये आगामी लढतीत लोकेश राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. मात्र डाव्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे धवन संपूर्ण विश्वचषक स्पर्धेला मुकू शकतो. त्यामुळे धवनला पर्याय म्हणून युवा फलंदाज ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि अंबाती रायुडू यांची नावे आघाडीवर आहेत. शिखर धवनच्या अनुपस्थितीत युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत याला संघात स्थान मिळण्याची शक्यता जास्त आहे. अशा परिस्थितीत लोकेश राहुल रोहित शर्मासोबत सलामीला येईल. तर ऋषभ पंत खालच्या फळीत फलंदाजीला येऊ शकतो. ऋषभ पंतला विश्वचषक संघात स्थान न मिळणे हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर अंबाती रायुडू आणि ऋषभ पंत यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : धवनला पर्याय म्हणून 'या' खेळाडूंची नावे आघाडीवर
ICC World Cup 2019 : धवनला पर्याय म्हणून 'या' खेळाडूंची नावे आघाडीवर
डावखुरा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आवड्यासांठी संघाबाहेर झाल्याने भारतीय संघाच्या विश्वचषक स्पर्धेतील मोहिमेला जबरदस्त धक्का बसला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 15:27 IST