Join us

ICC World Cup 2019 : टीम इंडियाची फिल्डिंग सर्वात भारी! केवळ एक झेल सोडला

टीम इंडियाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या सांघिक खेळाने सर्वांना प्रभावित केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 03:48 IST

Open in App

मुंबई  - टीम इंडियाने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या सांघिक खेळाने सर्वांना प्रभावित केले. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये काही प्रमाणात चढ-उतार पाहण्यास मिळाला असला, तरी भारतीयांच्या क्षेत्ररक्षणाने मात्र सर्वांनाचा अचंबित केले आहे. त्यामुळेच भारताच्या अपराजित घोडदौडीत केवळ फलंदाजी किंवा गोलंदाजीचे योगदान नसून, यामध्ये क्षेत्ररक्षणाचाही सिंहाचा वाटा आहे.यंदाच्या विश्वचषकामध्ये भारतीय संघाने आतापर्यंत झालेल्या आपल्या सामन्यांमध्ये केवळ एक झेल सोडला आहे. त्याच वेळी या स्पर्धेत सर्वाधिक झेल सोडण्यात पाकिस्तानने अव्वल स्थान पटकावले आहे. पाकिस्तानने आतापर्यंत आपल्या सामन्यात मिळालेल्या २६ झेलपैकी तब्बल १४ झेल सोडले आहेत. यासह पाकिस्तानच्या झेल सोडण्याची टक्केवारी ३५ टक्के इतकी झाली आहे. पाकिस्तानचा ६ पैकी एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे.संभाव्य विश्वविजेते मानले जात असलेल्या यजमान इंग्लंडकडूनही फारसे चांगले क्षेत्ररक्षण पाहण्यास मिळालेले नाही. त्यांना या स्पर्धेत आतापर्यंत ४२ झेल घेण्याची संधी मिळाली आणि त्यापैकी ३२ झेल त्यांनी घेतले असून, १० झेल मात्र सोडले. भक्कम क्षेत्ररक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या द. आफ्रिकेनेही ७ झेल सोडले आहेत.आतापर्यंत भारतीयांनी केवळ एक झेल सोडला आहे. पावसामुळे एक सामना रद्द झाल्यानंतर पाचपैकी ४ सामने खेळताना भारतीयांना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांकडून १५ झेल घेण्याची संधी मिळाली आणि त्यापैकी केवळ एक झेल घेण्यात भारतीयांना अपयश आले.

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघवर्ल्ड कप 2019