Join us

ICC World Cup 2019 : अफगाणिस्तान स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील

आता विश्वचषक स्पर्धेत काही दिग्गज संघांविरुद्ध शानदार कामगिरी केल्यानंतर अफगाणिस्तान संघाने त्यांना कमकुवत समजणे चुकीचे असल्याचे सिद्ध केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 06:19 IST

Open in App

लीड््स : उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकल्या गेलेल्या उभय संघांदरम्यान गुरुवारी ज्यावेळी लढत होईल त्यावेळी अफगाणिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेत पहिला विजय नोंदवण्यासाठी प्रयत्नशील राहील. त्याचवेळी वेस्ट इंडिज संघ प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळेल.अफगाणिस्तानने वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाला गेल्या वर्षी हरारेमध्ये झालेल्या विश्वचषक पात्रता स्पर्धेत दोनदा पराभूत केले होते. त्यात ख्रिस गेल, कार्लोस ब्रेथवेट आणि शाई होप यांचा समावेश होता. आता विश्वचषक स्पर्धेत काही दिग्गज संघांविरुद्ध शानदार कामगिरी केल्यानंतर अफगाणिस्तान संघाने त्यांना कमकुवत समजणे चुकीचे असल्याचे सिद्ध केले आहे. त्यांनी स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकासारख्या संघांविरुद्ध कडवी लढत दिली आहे. हे सर्व संघ अफगाणिस्तानच्या आक्रमक गोलंदाजीपुढे संघर्ष करीत असल्याचे दिसले. त्यात मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांचा समावेश आहे.वेस्ट इंडिज संघ या स्पर्धेत तिसऱ्यांदा विजयाजवळ पोहोचल्यानंतर पराभूत झाला. श्रीलंकेविरुद्धच्या लढतीपूर्वी विंडीज संघाने आॅस्ट्रेलियाला पराभूत करण्याची संधी गमावली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत कार्लोस ब्रेथवेट विजयी षटकार ठोकण्यात अपयशी ठरला. श्रीलंकेविरुद्ध पराभूत झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर म्हणाला, ‘अनेक लढतीत विजया समीप पोहोचल्यानंतर पराभव स्वीकारावा लागणे निराशाजनक आहे.’दोन्ही संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत आणि अफगाणिस्तान संघ गुणतालिकेत अखेरच्या स्थानी, तर विंडीज संघ त्यापेक्षा एक स्थान वर आहे.१९७५ व १९७९ मध्ये विश्वचषक जिंकणाºया विंडीजने सलामी लढतीत पाकिस्तानला नमवून चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर त्यांनी सलग सात सामने गमावले. प्रतिष्ठेच्या स्पर्धेतून बाहेर पडताना अखेरच्या लढतीत विजय मिळविणे दिलासा देणारे ठरेले. अफगाण कर्णधार गुलबदनला मायदेशी परतण्यापूर्वी फिरकीपटूंकडून अखेरच्या लढतीत चमकदार कामगिरीची आशा असेल. (वृत्तसंस्था)हेड-टू-हेडदोन्ही संघांदरम्यान सन २०१७ पासून आतापर्यंत ५ आंतरराष्टÑीय एकदिवसीय सामने झाले असून, अफगाणिस्तानने त्यापैकी ३ सामने जिंकून वर्चस्व राखले आहे. वेस्ट इंडिजने एक सामना जिंकला आहे. एक सामना अनिर्णित राहिला आहे. दोन्ही संघ विश्वचषक स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध खेळतील.सामना : दुपारी ३ पासून (भारतीय वेळेनुसार)

टॅग्स :वर्ल्ड कप 2019अफगाणिस्तान