लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दक्षिण आफ्रिका संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी बांगलादेशकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला. नावाजलेले फलंदाज व गोलंदाज संघात असूनही आफ्रिकेला हार मानावी लागल्यानं क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आफ्रिकेचा हा वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे आणि यापूर्वी एकदाच त्यांना अशा नामुष्कीचा सामना करावा लागला होता. पराभवाचे सत्र सुरु असताना त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज लुंगी एनगिडीला दुखापतीमुळे आठवडाभर विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ICC World Cup 2019 : सलग पराभवानंतर आफ्रिकेला आणखी एक धक्का, भारताविरुद्ध 'हा' गोलंदाज खेळणार नाही
ICC World Cup 2019 : सलग पराभवानंतर आफ्रिकेला आणखी एक धक्का, भारताविरुद्ध 'हा' गोलंदाज खेळणार नाही
ICC World Cup 2019 : दक्षिण आफ्रिका संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत रविवारी बांगलादेशकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 10:00 IST