पुणे :इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत पावसाच्या व्यत्ययामुळे भारत विरुद्ध न्यूझीलंडसह काही सामने खेळता आलेले नाहीत. त्यातच बहुप्रतीक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामान्यवरही पावसाचे सावट असल्याचे म्हटले जाते. अशा परिस्थितीत चाहत्यांची निराशा होऊ शकते. पण गेल्या दोन दिवसांपासून मात्र सोशल मीडियावर पावसाच्या व्यत्ययाला मिम्सच्या रूपाने धुवून काढण्याचं काम क्रिकेटप्रेमींनी केलं आहे. इतकेच नव्हे तर भारत- पाकिस्तान यांच्या दरम्यान होणारा सामना आणि पाऊस यावरही भन्नाट पोस्ट व्हायरल होत आहेत. अनेकांनी या पोस्ट स्टेटसला ठेवून क्रिकेटप्रेम दाखवलं आहे.
एका पोस्टमध्ये वर्ल्डकपच्या चषकावर छत्री धरली आहे तर दुसरीकडे चषकाचे रूपांतर छत्रीत केल्यासारखे दाखवले आहे. यातल्या एका पोस्टमध्ये इंग्लंडच्या व्यवस्थापनालाही सोडलेलं नाही. त्यांनाही लग्न ठेवत नाही त्या काळात वर्ल्डकप ठेवला आहे अशा शब्दात चिमटा काढला आहे.
आपल्याकड़े पावसाळ्यात लग्न ठेवत नाहीत...
आणि यांनी तर तिथे वर्ल्डकप ठेवलाय
पाऊस आला तर क्रिकेट नाही पण निवड फुटबॉल मॅच तरी खेळावा अशी भन्नाट मागणीही करण्यात आली आहे.
![]()
(साभार : सोशल मीडिया)
![]()
(साभार : सोशल मीडिया)
![]()
(साभार : सोशल मीडिया)