मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाला गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात लगेचच धक्का बसला होता. भारताचा सलामीवीर रोहित शर्माला (18) सहाव्या षटकात झेलबाद होऊन माघारी परतावे लागले होते. केमार रोचच्या गोलंदाजीवर तो यष्टिरक्षक शे होप्सच्या हाती झेल देऊन बाद झाला. पण, त्याला बाद देण्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे. रोचने टाकलेला इनस्विंग रोहितच्या बॅट अन् पॅडच्या मधून थेट यष्टिरक्षकाच्या हातात विसावला. मैदानावरील पंचांनी यावर निकाल दिला नाही पण विंडीजनं तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली.
हार्दिक पांड्याला माझ्या मार्गदर्शनाची गरज, पाकिस्तानी खेळाडूचा दावादमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतानेवेस्ट इंडिजवर दममाखदार विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ 11 गुणांसह उपांत्य फेरीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 268 धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाटलाग करताना वेस्ट इंडिजचे फलंदाज मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा यांच्या वेगवान गोलंदाजीचे शिकार ठरले. भारताच्या अचूक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजला भारताचे आव्हान पेलवले नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 125 धावांनी दणदणीत विजय मिळवला.