- ललित झांबरे
वेस्ट इंडिजविरुध्दच्या सामन्यात गुरूवारी अॉस्ट्रेलियाच्या कोल्टर नाईलने आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन 92 धावा केल्या. ही विश्वचषक सामन्यात आठव्या क्रमांकावरील फलंदाजाने केलेली सर्वोत्तम खेळी ठरली. त्याने झिम्बाब्वेच्या हिथ स्ट्रिकचा 2003 मधील 72 धावांचा विक्रम मागे टाकला. ऑस्ट्रेलियातर्फे याआधीची विश्वचषकातील आठव्या क्रमांकाची खेळी ब्रॅड हाडिनच्या 43 धावांची (2015) होती तर एकूणच वन डे क्रिकेटमध्ये आठव्या क्रमांकावरील सर्वोच्च खेळी इंग्लंडच्या ख्रिस वोक्सच्या नाबाद 95 धावांची आहे. यानिमित्ताने जाणून घेऊ या विश्वचषक स्पर्धेतील प्रत्येक क्रमांकावरील सर्वोच्च खेळी काय आहे.
क्रम धावा फलंदाज देश विरुध्द वर्ष 1- 237- मार्टिन गुप्तील (न्यूझीलंड) वि.
वेस्ट इंडिज 2015
2- 215- ख्रिस गेल ( वेस्ट इंडिज) वि. झिम्बाब्वे 2015
3- 145- राहुल द्रविड ( भारत) वि. श्रीलंका 1999
4- 181- विव्ह रिचर्डस् ( वेस्ट इंडिज) वि. श्रीलंका 1987
5- 162- डिव्हिलिययर्स ( दक्षिण आफ्रिका) वि. वेस्ट इंडिज 2015
6- 175- कपिल देव ( भारत) वि. झिम्बाब्वे 1983
7- 89- डॅरेन सॅमी ( वेस्ट इंडिज) वि. आयर्लंड 2015
8- 92- कोल्टरनाईल ( ऑस्ट्रेलिया ) वि. वेस्ट इंडिज 2019
9- 64- अँडी बिचेल ( ऑस्ट्रेलिया) वि. न्यूझीलंड 2003
10- 48- डॅरेन पॉवेल ( वेस्ट इंडिज) वि. दक्षिण आफ्रिका 2007
11- 43- शोएब अख्तर ( पाकिस्तान) वि. इंग्लंड 2003