ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. न्यूझीलंड : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना न गमावलेले दोन बलाढ्य संघ आज एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. न्यूझीलंड संघ तीन विजयांसह अव्वल स्थानावर आहे, तर भारतानं दोन सामने जिंकून टॉप फोरमध्ये मुसंडी मारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण, क्रिकेट चाहत्यांच्या या उत्सुकतेवर आज पाणी फिरण्याची शक्यता आहे. येथील स्थानिक हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचा खेळ पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधवनं पावसाकडे गाऱ्हाणं गायलं आहे. त्यानं नॉटिंगहॅम येथे नाही, तर महाराष्ट्रात तुझी गरज असल्याची विनंती वरुण राजाला केली आहे.
इंग्लंडमध्ये पहिल्यांदा किवींना लोळवण्याचे भारतापुढे आव्हानजखमी शिखर धवनच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने पर्यायी व्यवस्था केली असली तरी, गुरुवारी फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडचा भेदक मारा खेळण्यासह पावसाचे अवघड आव्हान विजयाच्या मार्गात येऊ शकते. सराव सामन्यात याच न्यूझीलंडकडून एकतर्फी पराभव पत्करावा लागल्याने भारताला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. तसेच इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकदाही भारताला न्यूझीलंडला पराभूत करता आलेले नाही. त्यामुळेच भारतापुढे मोठे आव्हान असेल. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसाचे सावट या लढतीवरही आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे षटकांची संख्या कमी होऊ शकते. असे झाल्यास न्यूझीलंडचा वेगवान मारा भारतीय सलामीवीरांसाठी कठीण ठरू शकतो.
हेड-टू-हेड- दोन्ही संघांदरम्यान १०६ आंतरराष्ट्रीय वन डे सामने झाले असून त्यापैकी भारताने ५५ सामने, तर न्यूझीलंडने ४५ सामने जिंकले आहेत. एक सामना टाय झाला असून ५ सामने अनिर्णित राहिले आहेत.
- दोन्ही संघांमधील शेवटच्या पाच लढतींमधील चार सामने भारताने जिंकले असून एका सामन्यामध्ये न्यूझीलंड जिंकला आहे.
- दोन्ही संघांदरम्यान वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ७ सामने झाले असून यातील ४ सामन्यांमध्ये न्यूझीलंडन, तर तीन सामने भारताने जिंकले आहेत.
- वर्ल्ड कपमध्ये भारताने न्यूझीलंडविरुद्ध २५२, तर न्यूझीलंडने भारताविरूद्ध २५३ धावा अशी सर्वोच्च धावसंख्या केली आहे.
- भारताची न्यूझीलंडविरुद्ध १५० धावांची नीचांकी असून न्यूझीलंडची नीचांकी धावसंख्या १४६ आहे.