ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. न्यूझीलंड : तासभर विलंबाने का होईना भारत आणि न्यूझीलंड सामन्यावर वरूण राजानं कृपादृष्टी दाखवली. ट्रेट ब्रिजच्या खेळपट्टीवर घालण्यात आलेले कव्हर काढण्यात आले असून लवकरच टॉस होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पाऊस थांबला असून पाच वाजता पुन्हा खेळपट्टीची चाचपणी करण्यात येईल.