Join us

ICC World Cup 2019 : इंग्लंड-न्यूझीलंड सामन्यात चौकारही समान असते तर कोण जिंकलं असतं?

ICC World Cup 2019: क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर झालेला अंतिम सामना कुणीच विसरू शकणार नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला रोमहर्षक सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्येही काहीच निकाल हाती आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 15:13 IST

Open in App

लॉर्ड्स, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर झालेला अंतिम सामना कुणीच विसरू शकणार नाही. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला रोमहर्षक सामना बरोबरीत सुटला आणि सुपर ओव्हरमध्येही काहीच निकाल हाती आला नाही. या सामन्यानं सर्वांची उत्कंठा ताणून धरली होती. कोण जिंकेल हे अखेरपर्यंत छातीठोकपणे कोणीच सांगू शकत नव्हते. त्यामुळेच या सामन्यात दोन्ही संघ अपराजितच राहिले, परंतु अधिक चौकारांमुळे यजमान इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आले. आयसीसीच्या या निर्णयावर सडकून टीका झाली. पण, याच सामन्यात चौकारांची संख्या समान राहिली असती तर कोण जिंकल असतं? चला जाणून घेऊया...- सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटल्यानंतर ज्या संघांनं 50 षटकं आणि सुपर ओव्हर असे मिळून सर्वाधिक चौकार मारले त्याला विजयी घोषित केले जाते, त्यानुसारच जेतेपदाचा मान इंग्लंडला मिळाला- याच आधारावर दोन्ही संघांच्या चौकारांची संख्याही समान राहिली असती तर केवळ निर्धारीत 50 षटकांत ज्याचे चौकार जास्त तो विजयी घोषित झाला असता-  वरील दोन्ही नियमानंतरही दोन्ही संघाच्या चौकारांची संख्या समान राहिली असती तर सुपर ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर कोणी किती धावा केल्या, त्यावर विजेता ठरवता आला असता.-  पण, अखेरच्या चेंडूवर दोन्ही संघांनी समान धाव घेतली असता, पाचव्या चेंडूवरील धावांच्या आधारावर विजेता ठरवला गेला असता. याच प्रकारे सुपर ओव्हरच्या चार चेंडूंत दोन्ही संघाच्या दोन विकेट गेल्या असत्या, तर चौथ्या चेंडूवरील धावांचा आधार घेतला गेला असता. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019इंग्लंडन्यूझीलंडआयसीसी